Children Care : तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण लहान मुलांना लहानाचं मोठं करणं हे खूप जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना खूप कमी समज असते. त्यांना एक एक गोष्ट अक्षरशः खूप संयम ठेऊन  शिकवावी लागते. (children health care tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यापैकी ज्या कोणाच्या घरी लहान मुलं आहे त्या सर्वांची एक सामान्य तक्रार असते आणि ती म्हणजे, ,मुलं सतत काहींना काही तोंडात घालतात. त्यांना खाली पडलेल्या वस्तू, कचरा काहीही तोंडात घालण्याची वाईट सवय असते. कितीही प्रयत्न करून त्यांची ही सवय सुटत नाही. अशावेळी काय करावं हे पालकांना समजत नाही . कारण, रागावून दमटवून सांगण्याच्या वयात ती नसतात.  (children health care tips)


मुलांची ही वाईट सवय आरोग्याला घातक असते . जमिनीवरच काहीही तोंडात घातलं तर असंख्य वाईट बॅक्टरीया त्यांच्या पोटात जाऊन त्यांना आजारी बनवु शकतात. अशावेळी काय करावं (children tips if they are eating soil bad habbits how to stop) त्यांची सवय कशी बंद करायची यासाठी काही महत्वाच्या टिप्स आज जाणून घेऊया. 


मुलांना भरपूर केळी खाऊद्या 


केळ हे बारमाही फळ म्हणून ओळखलं जातं. केळ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वाधिक असतं. केळ खाल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. आणि माती किंवा काहीही तोंडात घालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊन जातं. (calcium reach food)


नॉन फूड पदार्थ देऊ नका


लहान मुलांना जंक फूड अजिबात देऊ नका. यामुळे पोषक तत्व मिळत नाहीत आणि शरीराला लागणार पोषण मिळालं नाही तर त्याची कमतरता निर्माण होऊन मुलांना माती किंवा तत्सम पदार्थ खाण्याची सवय लागते.  (children health care tips)


लवंग ठरेल फायदेशीर 


तुमच्या मुलांना माती खायची खूपच सवय असेल तर २-४ लवन्ग पाण्यात भिजवा आणि त्याच पाणी मुलांना पाजा याचा नक्कीच फायदा होतो आणि मुलांची ही सवय सुटते.  (children health care tips)


(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारे आहे, झी २४ तास याची खातरजमा करत नाही)