मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरत आहे. म्हणून चीनने कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन दिवसांत नवे हॉस्पिटल उभारले आहे. २८ जानेवारी रोजी वुहान जवळील ग्राऊंड झीरो परिसरात हे रूग्णालय उभारण्यात आले आहे. वुहानमधूनच या व्हायरसचा प्रसार झाला आणि बघता-बघता हा व्हायरस संपुर्ण जगात पसरला आहे. कामगार, स्वयंसेवक, बांधकाम संस्था आणि निमलष्करी दलाच्या पोलिसांनी या कामास गती दिली आहे. अवघ्या दोन दिवसांत एका रिकाम्या इमरतीत त्यांनी १ हजार बेडची व्यवस्था केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक मीडियाच्या सांगण्यानुसार कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या रूग्णानां आधिच डेबी माउंटन रीजनल मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांत चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी नवं रूग्णालय उभारण्यात आले आहे. 


कोरोना व्हायरसने आतापर्यंत एकूण ३६० लोकांचा बळी घेतला आहे. याशिवाय चीनसोबतच संपूर्ण जगातील १७ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने हाय अलर्ट जारी केला आहे. 


कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एअर इंडियाच्या विमानातून भारतीयांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे.