धक्कादायक ! कोरोना व्हायरस हवेतून पसरतोय?
चीनमधली भयंकर परिस्थिती
मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान पहायला मिळतं आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. एकट्या हुबई प्रांतात एका दिवसांत तब्बल २४२जणांचा मृत्यू झालाय. या आकडेवारीवरूनच कोरोना व्हायरसची गंभीरता लक्षात येत आहे. कोरोनासंदर्भात एक खळबळजनक खुलासा झाला आहे. कोरोनाचे विषाणू हवेतून उडून एका ठिकाणहून दुसरीकडे पसरतायत, असं चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
कोरोनानं जगात अक्षरशः हलकल्लोळ केला असताना आता एक झोप उडवणारी बातमी समोर आलीय आहे. कोरोना व्हायरसबद्दल सगळ्यात मोठा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. शांघाईमधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचं हवेतून संक्रमण होत आहे
म्हणजेच कोरोनाचे विषाणू हवेतून उडून दुसरीकडे पसरत आहेत.
हवेतल्या दवकणांना चिटकून कोरोनाचे विषाणू दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहेत
याला एयरोसोल ट्रांसमिशन म्हटलं जातं
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलं तरच कोरोना होतो, असा आतापर्यंत समज होता. पण आता हवेतूनही कोरोना पसरत असल्याचं समोर आलंय. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत हजारांवर मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगत असली तरी काही विश्लेषकांच्या दाव्यानुसार चीनमध्ये आतापर्यंत पन्नास हजारांच्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेत. तर १५ लाख लोक कोरोनामुळे बाधित झालेत. कोरोनाचा खोटा आकडा सांगून चीन जगाची फसवणूक करतोय का ? पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोरोनाचं आक्रमण भारतावर झालंच तर भारत त्यासाठी तयार आहे का?