विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई : बाळ रडलं की त्याला चॉकलेटं दिलं जातं, पिझ्झा बर्गर देण्याचं आमिष सुद्धा दाखवलं जात, येणारे पाहुणेही बाळासाठी अनेकदा चॉकलेट आणतात, मात्र या सगळ्याचा बाळाच्या दातांवर काय परिणाम होतो, अगदी एक चॉकलेटही बाळाला किती त्रासदायक ठरू शकतं याचा विचार कधी केला का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॉकलेट, मिठाई, कँन्डी, चिप्स सारखे पदार्थ दातात चिकटून राहतात, त्यातून किटाणू तयार होतात, ते अॅसिड तयार करतात, त्यामुळ दात किडतात, ही किड दातांच्या नसांपर्यंत जाते, आणि मग रुटकॅनल करुन कृत्रिम दात बसवला जातो. लहान वयात हेच सगळं खाल्ल्याने १०० पैकी ६० मुलांच्या दातांचं रुटकॅनल करण्याची वेळ आलीय. औरंगाबादच्या दंत महाविद्यालयात गेल्या तीन वर्षात तब्बल ३० हजार मुलांवर हे उपचार कऱण्यात आले आहेत. 


हे सगळं टाळणंही शक्य आहे, मुलं नीट दात घासतायत ना, याकडे लक्ष ठेवा. सतत चॉकलेट आणि गोड पदार्थ देणं टाळा. 


लहान वयातच कृत्रिम दात बसवला तर त्या दाताचं आयुष्य फार नसतं. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या मुलांच्याही दातांची काळजी नक्की घ्या. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून ही चॉकलेट बँक नक्की सुरू करा.