How to Reduce Cholesterol: आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल (Cholesterol) गरजेचे आहे. मात्र, बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर निघण्याची गरज आहे. अन्यथा नसा फुगतील किंवा गाठ निर्माण होऊन रक्त प्रवाह थांबेल. (Health News) ज्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतो. आजकाल प्रत्येक चौथा व्यक्ती शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे चिंतेत आहे. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ आहे, जो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आढळतो. हा पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी काही उपाय आहेत. हे आयुर्वेदिक उपाय केले तर कोलेस्ट्रॉल वितळून शरीरातून बाहेर पडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण जे काही अन्न खातो त्यातून कोलेस्ट्रॉल बनलेले असते. जोपर्यंत ते ठराविक प्रमाणात आहे, तोपर्यंत काही हरकत नाही, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण (High Cholesterol) वाढते तेव्हा ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते. अशा परिस्थितीत अनेकांना आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, काही आयुर्वेदिक उपाय आहेत. ते तुम्ही घरीही करु शकता.


  • कोलेस्ट्रॉलमुळे रुग्णाला मोठा धोका, मृत्यूही ओढवू शकतो 


ट्रायग्लिसराइड्स आणि उच्च कोलेस्ट्रॉल एकत्र नसांमध्ये अनेक वेळा जमा होतात, ज्यामुळे शरीराला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो, असे डॉक्टर सांगतात.  अशा समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाशी संबंधित काही सोपे उपाय करु शकता. ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या आरोग्याला येणाऱ्या धोक्यापासून वाचवू शकता. 


  • या गोष्टींचा आहारात समावेश करा


वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या टाळण्यासाठी (Cholesterol Control Ayurvedic Tips) सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. तुम्ही नेहमी घरी बनवलेल्या डाळी किंवा भाज्या फक्त मोहरी किंवा तिळाच्या तेलात तळून घ्याव्यात. आपल्या आहारात ड्रमस्टिक सूप, कढीपत्ता, लसूण आणि कांदे यांचा समावेश करण्याची खात्री करा.


  • दररोज 10 मिनिटे प्राणायाम करा


कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी  (Cholesterol Control Ayurvedic Tips) तुम्ही जास्त फायबर आणि कमी चरबीयुक्त अन्न खावे. यासोबतच रोज 20 मिनिटे फास्ट वॉक किंवा जॉगिंग करा. तणावापासून स्वतःला वाचवण्यासाठी दररोज 10 मिनिटे प्राणायाम करणे देखील चांगले आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. 


  • आवळा-आल्याचा रस सेवन करा


कोलेस्ट्रॉल (Cholesterol Control Ayurvedic Tips) आणि ट्रायग्लिसराइड्ससारखे वाईट पदार्थ शरीरातील वाढणे वेळीच थांबवले पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी तुम्ही आवळा आणि आल्याचा रस घेऊ शकता. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी तुम्ही 5.5mlआल्याचा रस आणि 10 ml आवळ्याचा रस मिक्स करुन रोज सकाळी शेक करा. यानंतर, सकाळी ते प्यायल्यानंतर आपले काम सुरु करावे. ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)