मुंबई : शरीरातील कोलेस्टेरॉल वाढलं की हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल ही आपल्या शरीरातील चरबी आहे, ज्याची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्त प्रवाह मंद होतो. तज्ज्ञांच्या मते, जर कोलेस्ट्रॉल 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) पेक्षा जास्त असेल तर ही स्थिती धोकादायक ठरू शकते. खराब जीवनशैली आणि आहारामुळे ही त्रास होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं मानलं जातं की, एखाद्याला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास झाला की त्याला दीर्घकाळ हृदयविकाराशी संबंधित औषधं घ्यावी लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल किंवा वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांमुळे कोणाचीही कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढू शकते.


अति प्रमाणात कॉफी पिणं


चहाप्रमाणे कॉफीमध्येही कॅफेनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तज्ज्ञांच्या मतानुसार, जे लोक कॉफीचं जास्त सेवन करतात, त्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढू लागते. इतकंच नाही तर जास्त कॉफी प्यायल्याने व्यक्तीला हाय रक्तदाबाचा रुग्णही होऊ शकतो. कॅफेनचं जास्त सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी बिघडते, असं अनेक संशोधनातून समोर आलंय.


ताण


बहुतेक जण काम किंवा इतर कारणांमुळे रोज ताणतणावात असतात. तणावामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि शरीराच्या अनेक कार्य बिघडतात. जर एखाद्याला सतत तणावाची समस्या असेल तर कोलेस्टेरॉलची पातळी अचानक वाढू शकते. असं म्हणतात की, तणावामुळे कोर्टिसोल हार्मोनची कार्यक्षमता कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते.


स्मोकिंग


सिगारेटमध्ये निकोटीन किंवा तंबाखू असतो, ज्यामुळे अचानक कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. याशिवाय इतरही अनेक कारणं आहेत, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, अशी काही औषधं आहेत जी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.