What to eat to reduce Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि हार्ट अॅटॅकचा धोका निर्माण होतो. बाजारात आलेल्या औषधांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते. मात्र आजकाल जीवनशैली इतकी बदलली आहे की, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारावर हा फार गरजेचा आहे. तुमच्या किचनमधील पांढरा पदार्थ हा तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी मदत करु शकतो. (Cholesterol Reduce Food coconut chutney Destroys Cholesterol Heart Attack Keeps Diabetes Under Control)


'ही' पांढरी चटणी अतिशय फायदेशीर!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रीयन घर असो किंवा दक्षिणेतय प्रत्येक घरात स्वयंपाकात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पदार्थांमध्ये नारळाचा वापर तर होतो. पण या घरांमध्ये आवर्जून बनवली जाते ती नारळाची चटणी...न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार ही पांढरी नारळाची चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नारळाची ही चटणी सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याशिवाय रक्तदाब नियंत्रित करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पचन सुधारण्यासाही मदत मिळते. मात्र या चटणीत सॅच्युरेटेड फॅट असल्याने ती योग्य प्रमाणात सेवन करावी लागते. अन्यथा तिचे शरीरावर वाईट परिणाम होतात. 


न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार तुम्ही नारळाची चटणी 2-3 चमचे दररोज खाऊ शकता. नारळात जास्त प्रमाणात फायबर असतं त्यामुळे ही नारळाची चटणी खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. त्याशिवाय या चटणीच सेवन केल्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यापासून मुक्तता मिळते. तसंच पोटातील हानिकारक बॅक्टेरिया साफ करण्यासही मदत मिळते. 


नारळाच्या चटणीत  अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ती आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. तर नारळातील फायबरचे प्रमाण 13.6 ग्रॅम (45.3% RDA) असतं. ज्यामुळे शरीरातीलकोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर हृदयाशी संबंधित आजाराचा धोका नारळाची चटणीचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास फायदा होतो. 


नारळाची चटणी खाल्ल्याने इन्सुलिन स्रावाची क्रिया सुधारण्यास मदत मिळते आणि रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रणात राहते. अगदी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळाची चटणी उपयुक्त ठरते. कारण या चटणीचं सेवन केल्यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत मिळते. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)