मुंबई : वाढणारे वजन, स्थुलता, जाडेपणा ही आजकालची सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे असली तरी एक धक्कादायक कारण समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार घराची साफसफाई करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल प्रॉडक्समुळे वजन वाढते, असे दिसून आले आहे. यात असलेल्या टॉक्सिन्समुळे मेटाबॉलिझमची गती कमी होते. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. 


अहवालानुसार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभ्यासानुसार दुसऱ्या महायुद्धानंतर सुमारे ८०,००० केमिकल्स हवेत मिसळले गेले आहेत. आणि प्रत्येक वर्षी १५०० नवीन केमिकल्स हवेत सोडले जातात. हे घातक केमिकल्स हवा. पाणी आणि अन्नात देखील आढळून येतात. ते घरातील धुळीत अगदी सहज मिसळतात.


पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये प्रकाशित अहवालानुसार, घरात जमा होणाऱ्या धुळीत चरबी वाढवणारे आणि सेमीवोलेटाइल आर्गेनिक केमिकल्स असतात. संशोधकांनी ११ घरातील धुळ जमा करून उंदरांच्या सेल्सवर प्रयोग केला.


त्यातून असे दिसून आले की, घरातील सामान, प्लास्टिकची घरगुती उपकरणे, एयर फ्रेशनर, मेणबत्त्या यात फास्फेट (phthalates) आणि बीपीए यांसारखे विषारी घटक असतात. यामुळे वजन वाढण्याबरोबरच हार्मोनचे असंतुलन. कॅन्सर यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. 


काय खबरदारी घ्याल ?


  • घर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि तो तुमचा अग्रक्रम असायला हवा. घराच्या सफाईसाठी व्हॉक्मूक क्लिनर वापरा.

  • दरवाजे, खिडक्या गरज नसताना उघड्या ठेऊ नका. खिडक्यांना जाळ्या लावून घ्या.

  • चप्पल, बुट शक्यतो घरात काढू नका. 

  • हाय पार्टिकुलेट एयर फ़िल्टरचा वापर करा, त्यामुळे हवा स्वच्छ होते.