Children's Disease: एखादा आजार झाला की, लगेच आपण डॉक्टरकडे धावतो. यावेळी डॉक्टर देखील झालेल्या आजाराची तपासणी करून औषधोपचार करतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीला दुर्मिळ आजार झाला असेल तर... नोएडातील डॉक्टरांनी असंच एका 6 महिन्यांच्या बाळाला जीवनदान दिलं आहे. मुळात म्हणजे या बाळाला दुर्मिळ आजार झाला होता. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्याच्यावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 महिन्यांचा अयान 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ रूग्णालयात दाखल होता. अयानला झालेली आजार इतका दुर्मिळ होता की, डॉक्टरांना त्याचं निदान करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला. या 2 महिन्यांच्या चिमुकल्याला नेमकं काय झालंय याचं निदान करण्यासाठी डॉक्टरांनी बऱ्याच तपासण्या केल्या. दरम्यान या तपासणीतून असं लक्षात आलं की, या बाळाला झालेली ही समस्या यापूर्वी कधीच कोणत्या लहान बाळाला झालेली नव्हती. अयानला  CMV Menengitis नावाच्या समस्येने ग्रासलं होतं. 


मिळालेल्या माहितीनुसार, अयानला मेनेंजायटीससोबत फंगल इंफेक्शनची समस्या देखील होती. Rhodoturula fungal infection त्याला झालं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल मेनेंजायटीसची समस्या दिसून येते. मात्र या लहानग्याला वायरल मेनेंजायटीस झालं होतं. त्यामुळे हे देखील एक दुर्मिळ प्रकरण असल्याचा दावा करण्यात येतोय. 


अयानच्या केल्या बऱ्याच टेस्ट


अयान 2 महिन्याचा असताना त्याला सतत ताप येत असल्याने डॉक्टरांना बॅक्टेरियल मेनेंजायटीस असल्याचा संशय आला. त्यानुसार अयानवर उपचार देखील सुरु करण्यात आले. मात्र त्याचा ताप काही केल्या जात नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. यानंतर त्याच्या पाठीच्या कण्यातील लिक्विड काढून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याला CMV Menengitis असल्याचं समोर आलं.


अनेक औषधं आणि इंजेक्शन देऊन देखील अयानचा ताप काही कमी होत नव्हता. यावेळी डॉक्टरांनी पुन्हा एकदा पाठीच्या कण्यातील लिक्विडची तपासणी केली. सेरिब्रोस्पायनल फ्लूइडची पुन्हा तपासणी केल्यानंतर या बालकाला Rhodoturula fungal infection असल्याचं लक्षात आलं. हे फार दुर्मिळ असून त्याला Amphoterecin B या औषधाद्वारे उपचार देण्यात आले. अखेरीस या औषधामुळे या बालकाचा ताप उतरला. 


आता अयान 6 महिन्यांचा झाला असून अजून काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. आता त्याचा जीव धोक्यातून बाहेर आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान या बाळाला हा आजार का आणि कसा झाला, याची माहिती अजूनही डॉक्टरांना समजलेलं नाही.