Coconut Benefits: खोबरं खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत?
नारळाचे पाणी, नारळाचे तेल आणि किसलेले नारळ याचे अनेक फायदे आहेत.
मुंबई : नारळ हे असे सुपरफूड आहे, ज्याचा वापर पूजेपासून ते जेवणापर्यंत वापरले केला जातो. एवढंच काय तर याच्यापासून गोड पदार्थ बनवतात. नारळच नाही तर त्याच्या झाडं आणि झावळ्यांचा ही वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. म्हणजे तसा विचार केला तर नारळाचा किंवा त्याच्या झाडाचा असा कोणताही भाग नाही, ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही. नारळाला आयुर्वेदात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
नारळाचे पाणी, नारळाचे तेल आणि किसलेले नारळ याचे अनेक फायदे आहेत. नारळात आढळणाऱ्या गुणधर्मांबद्दल सांगायचे झाले तर, कच्च्या नारळात तांबे, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त सारखी खनिजे असतात.
याशिवाय त्यात हेल्दी फॅटही आढळते. कच्चे खोबरे खाल्ल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. नारळात आढळणारे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय याचे असे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही, चला तर मग जाणून घेऊया कच्च्या नारळाचे फायदे.
1. प्रतिकारशक्ती
कच्च्या नारळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नारळात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल घटक आढळतात, जे संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
2. लठ्ठपणा
कच्चे नारळ वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. नारळात असलेले ट्रायग्लिसराइड्स शरीरातील चरबी जलद बर्न होण्यास मदत करतात, तसेच यामुळे भूक देखील कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते.
3. अशक्तपणा
शरीरात उर्जेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. त्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही कच्चे नारळाचे सेवन करू शकता.
4. स्मरणशक्ती
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नारळ चांगले मानले जाते. बदाम, अक्रोड आणि खडी साखर मिसळून दररोज नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
5. उलट्या
कच्च्या नारळाच्या सेवनाने मळमळ आणि उलटीची समस्या आटोक्यात ठेवता येते. जर तुम्हाला मळमळ किंवा उलट्या होत असतील, तर नारळाचा तुकडा तोंडात थोडावेळ चघळल्याने उलट्या आणि मळमळ पासून आराम मिळतो.
6. कोलेस्टेरॉल
कच्चे नारळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कच्चे नारळ किंवा खोबरेल तेलापासून बनवलेले अन्न सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
7. त्वचा
कच्च्या नारळातील चरबी त्वचेला पोषण देते, ते हायड्रेटेड ठेवण्यास देखील नारळ मदत करते. कच्च्या नारळाचे सेवन केल्याने त्वचेला कोरडेपणापासून वाचवता येते.
8. पचन
कच्चा नारळ पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये आढळणारे गुणधर्म अन्न जलद पचन करण्यास मदत करतात. हे पोटाचे आरोग्य आणि आतड्याची हालचाल उत्तम राखण्यात देखील मदत करतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)