कोकोनट शुगर की पांढरी साखर, काय खाणे आरोग्यास फायद्याचे?
Coconut Sugar Benefits: साखर खाणं हे आरोग्यास चांगलं नाही,पण तुम्हाला माहित आहे का ? ही कोकोनट शुगर आरोग्यास किती फायदेशीर आहे. कोकोनट शुगरचे आपल्या आरोग्यास बरेच फायदे आहेत.
Why Coconut Sugar Is Healthier Than White Sugar: साखरेपासून बनवलेले पदार्थ आपण सगळेच खातो, पण ही साखर आरोग्यास खूप हानिकारक आहे. तुम्हाला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. डायबिटीज असलेल्यांना साखर खाणं वर्ज असते, पण तुम्ही कोकोनट शुगरचा विचार केलात का? कोकोनट शुगरला कोकोनट पाम शुगरही म्हणतात , जी दिसायला तपकिरी रंगाची असते. पोषणतज्ज्ञ निखिल वत्सांनी साध्या साखरेच्या तुलनेत कोकोनट शुगर आरोग्यास का चांगली आहे? हे सांगितले आहे.
कोकोनट शुगरचे फायदे
1.Full Of Nutrients
कोकोनट शुगर तयार झाल्यावर त्या साखरेत असलेले पोषक तत्व टिकून राहतात. या साखरेत कॅल्शियम, पोटॅशियम , लोह आणि झिंक असतं. या पोषकतत्वाची मात्रा कमी असते पण तरी तुम्ही याचे सेवन करु शकतात.
2.Low Glycemic Index
साध्या साखरेच्या तुलनेत कोकोनट शुगरमध्ये ग्लाइसिमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असतं. या साखरेमुळे शरिरातील शुगर लेवल जास्त वाढत नाही , डायबिटीज रुग्ण देखील या साखरेचा वापर करु शकता, आणि ज्या लोकांना डायबिटीज सारख्या कोणत्याही समस्या नाहीत त्यांनी देखील या साखरेचे सेवन करावे कारण या साखरेनं डायबिटीज सारख्या कोणत्याही समस्या होण्याची शक्यता कमी होते.
3.Natural sweet flavour
कोकोनट शुगर मध्ये नैसर्गिक गोड स्वाद असतो त्यामुळे बरेच गोड पदार्थ किंवा पेयामध्ये वापरली जाते. या साखरेची चव ही आपल्या साध्या साखरे एवढीचं गोड असते.
या गोष्टींची घ्यावी काळजी
डायबिटीज असलेल्या लोकांनी या साखरेचे सेवन करताना जास्त प्रमाणात करु नये कारण कोकोनट शुगर हे साखरेचेचं रुप आहे त्यामुळे या साखरेचे फायदे असले तरी नुकसान करु शकते. या साखरेचे सेवन जास्त केल्याने वजन वाढणे, शुगर स्पाईक किंवा दातांमध्ये किड लागणे किंवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)