मुंबई : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय. वाढता उन्हाळा अनेक शहरांतील लोकांसाठी जीवघेणा ठरतोय. यावेळी गरमीच्या दिवसांत थंड पाणी अमृतासमान असते. यामुळे तहानच भागली जात नाही तर शरीरही थंड होते. मात्र तुम्हाला माहीत आहे का उन्हाळ्यात अमृतासमान वाटणारे थंड पाणी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. थंड पाण्यामुळे पोटाच्या समस्या सतावतात. थंड पाणी प्यायल्याने पचनास त्रास होतो. पोटदुखी, अस्वस्थ वाटणे तसेच पोटातून विचित्र आवाज येणे यासारख्या समस्या सतावतात. 


२. तुम्ही ब्रेन फ्रीजबद्दल ऐकलेच असेल. हे बर्फाचे पाणी वा आईस्क्रीमच्या अधिक सेवनाने होते. थंड पाण्यामुळे मेंदूवरही परिणाम होतो.


३. थंड पाणी प्यायल्याने हृद्याची गती कमी होते. शरीरात वेगस नर्व्ह नावाची नस असते. थंड पाणी प्यायल्याने ही नस थंड पडते आणि हृदयाची गती कमी होते. 


४. रुम टेंपरेचरच्या हिशेबाने पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास सतावत नाही. दुसरीकडे अधिक थंड पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. 


५. थंड पाण्यामुळे लठ्ठपणा वाढण्यास मदत होते. थंड पाण्यामुळे शरीरातील जमा झालेले फॅट्स अधिक घट्ट होतात. यामुळे फॅट बर्न होण्यास त्रास होतो. जर तुम्ही वजन कमी करताय तर थंड पाणी पिणे टाळा.