Bathing Mistakes : अंघोळीनंतर तुम्ही देखील `या` चुका करता का? मग याचे परिणाम गंभीर होऊ शकतात
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणे खूप प्रभावी असते असे म्हणतात. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि फ्रेशही वाटते. पण...
मुंबई : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणे खूप प्रभावी असते असे म्हणतात. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि फ्रेशही वाटते. हे शरीर स्वच्छ करते आणि तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. पण अनेकदा आपण आंघोळीनंतर अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या त्वचेलाही अनेक प्रकारे नुकसान होते. त्या चुका कोणत्या आहेत आणि नक्की काय करायला हवं आणि काय नाही, हे जाणून घ्या.
आंघोळ केल्यावर केसांना टॉवेल गुंडाळणे
आंघोळ केल्यानंतर अनेक महिला सरास केसांना टॉवेल गुंडाळतात. आपण बऱ्याच महिलांना असं करताना पाहिलं आहे. परंतु टॉवेल गुंडाळणे केसांसाठी खूप हानिकारक आहे. कारण आंघोळीनंतर टॉवेलमध्ये केस वाळवणे खुप धोक्याचे ठरु शकते. असे केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे असे करण्यापेक्षा केस फक्त हलक्या हाताने केस पुसून ते कोरडे करावेत.
चेहऱ्यावर टॉवेल घासणे
अनेकदा लोक आंघोळ केल्यानंतर तोंड पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. परंतु काही लोक चेहरा खूप घासून तोंड पुसतात. परंतु असे न करता फक्त टॉवेल चेहऱ्यावर टॅप करुन चेहरा कोरडा करावा. यामुळे त्वचेचे नुकसान कमी होते.
ओले केस विंचरणे
बरेच लोक आंघोळ केल्यानंतर किंवा केस धुतल्यावर केस विंचरतात, त्यांना वाटते की अशा प्रकारे केस विंचरणे चांगले असले, पण तसे अजिबात नाही. असे केल्याने तुमचे केस खराब होतात तसेच तुमचे केस गळणे देखील सुरू होऊ शकते. त्यामुळे ओल्या केसांमध्ये केस कधीही विंचरु नका.
शरीर मॉइश्चरायझ ठेवणे
आपण सर्वजण आंघोळीनंतर आपला चेहरा मॉइश्चरायझ ठेवण्याची काळजी घेतो, परंतु आपल्या शरीराच्या इतर भागाला मॉइश्चरायझ करत नाही. आंघोळ केल्यावर तुमचे संपूर्ण शरीर कोरडे होते, त्यामुळे चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खोबरेल तेल देखील वापरू शकता.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)