मुंबई : प्रत्येक मुलीचे महिन्यातील ते चार-पाच दिवस जरा नाजूकच असतात. तो काळ म्हणजे मासिक पाळीचा. मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पाय दुखणे, चिडचि़ड होणे, असे अनेक त्रास होतात. विशेषतः सुरुवातीच्या दोन दिवसात काही काम करण्याचीही इच्छा होत नाही. काही वेळा हे दुखणे इतके असह्य होते की ते दूर करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या सगळ्यामुळे स्त्रीजीवनाला मिळालेले वरदान अनेकींना कटकट वाटू लागते. पण तुम्हाला माहित आहे का? तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे हे दुखणे अधिक वाढते. म्हणून मासिक पाळीच्या काळात चुकूनही करु नका या गोष्टी...


गोड आणि नमकीन खाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासिक पाळीच्या काळात चमचमीत खाण्याची इच्छा होते. मात्र या काळात अधिक साखर खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. कारण साखरेमुळे शरीरातील सुज वाढते आणि अधिक मीठ शरीरात वॉटर रिटेंशनचे कारण बनते. त्यामुळे तुमचे दुखणे पूर्वीपेक्षा अधिक वाढते. त्यामुळे या काळात हलके अन्न घ्या. अधिक मसालेदार, गोड आणि नमकीन खाणे टाळा.


अपुरी झोप


या दिवसात तुम्हाला ८-९ तास पूर्ण झोप घ्यायला हवी. हॉर्मोनल बॅलन्स टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे. पूर्ण झोप न मासिक पाळीत होणारा त्रास अधिक वाढेल.


अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन


मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी घेतो. मात्र अधिक कॅफेनचे प्रमाण मासिक पाळीत होणारा त्रास वाढवते. 


सिगरेट आणि अल्कोहोल


सिगरेट आणि अल्कोहोल आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे याचे सेवन विशेषतः मासिक पाळीच्या काळात यापासून दूर राहणे योग्य ठरेल. सिगरेट आणि अल्कोहोलच्या सेवनामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि त्रास वाढतो.


व्यायाम न करणे


मासिक पाळीत त्रास होत असल्याने आपण व्यायाम करणे टाळतो. मात्र असे करु नका. हलका व्यायाम करा. त्यामुळे रक्तसंचार सुरळीत सुरु राहील आणि दुखण्यावर आराम मिळेल.