मुंबई : कर्नाटकातील तुमकूर याठिकाणी एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इथल्या राष्ट्रीय महामार्गावर हजारो कंडोम रस्त्यावर विखुरलेले आढळले आहेत. या ठिकाणाहून जाणारे सर्व लोक हे पाहून आश्चर्यचकित झाल्याचं दिसून आलं. 


नॅशनल हायवेवर इतके कंडोम कसे आले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालानुसार, लोक राष्ट्रीय महामार्गावर कंडोम मोठ्या प्रमाणावर कसे आले याबद्दलचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे कंडोम रस्त्यावर एखाद्या गाडीतून पडले असण्याची शक्यता आहे. एखादी कंपनी हे कंडोम घेऊन जात असताना ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.


हे कंडोम काथसंद्रा-बटावरी लाईन राष्ट्रीय महामार्ग -48 वर सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे कंडोम मुद्दाम इथे फेकले गेले की चुकून रस्त्यावर पडले हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.


कंडोम पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल


विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या कंडोमचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. 


अनेक युजर्स रस्त्यावर कंडोम मिळाल्याची घटना म्हणजे कोणाचातरी खोडसाळपणा असल्याचं सांगतायत. शिवाय असंही म्हटलं जातंय की, या कंडोममधील काही कंडोम वापरलेले आहेत आणि काही न वापरलेले असतात.