केवळ महिला नाही तर आता पुरुषांसाठीही contraceptive pill; कसं काम करणार गर्भनिरोधक गोळी?
शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. महिलांना दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या हार्मोन्सवर परिणाम करतात.
Male contraceptive pill : शारीरिक संबंधांनंतर (Physical Relation) गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आहेत. आता पुरुषांसाठीही अशा गर्भनिरोधक गोळ्या बाजारात येण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी नर उंदरांवर केलेला प्रयोग ब-याच अंशी यशस्वी ठरलाय. पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या काम कशा करणार हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे.
शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. महिलांना दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या हार्मोन्सवर परिणाम करतात.
पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या ?
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या शुक्राणूंच्या वेगावर काम करतील
उंदरांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की, या गोळ्यांमुळे शुक्राणूंची गती किमान काही तासांसाठी का होईना स्थिर होऊ शकते.
शास्त्रज्ञांना एक असा सेल पाथ वे किंवा स्विच सापडलाय, ज्यामुळे शुक्राणूंची गती काही काळ मंदावते.
स्त्रीबीजापर्यंत न पोहोचण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे.
साधारण तीन तासांपर्यंत या गोळ्यांचा प्रभाव राहिल.
शारीरिक संबंधांच्या तासभर आधी या गोळ्या घेतल्या तर त्याचे परिणाम साधता येतील
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोळ्यांचा पुरुषांच्या हार्मोन्सवर परिणाम होणार नाही म्हणजेच या गोळ्यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतील. TDI-11861 या गर्भनिरोधक गोळ्यांचं नर उंदरांवर संशोधन करण्यात आलंय
अर्थात उंदरांवर करण्यात आलेला हा प्रयोग प्राथमिक अवस्थेत आहे. अजून बऱ्याच चाचण्या बाकी आहेत, उंदरानंतर या गोळ्यांचे प्रयोग थेट माणसांवर केले जाणार नाहीत. उंदरांनंतर सशांवरही त्याचे प्रयोग केले जातील. तरीही भविष्यात पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या बाजारात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.