या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे चिकन-मटण; कारण...
ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते.
मुंबई : अनेकदा पौष्टिक आहारामुळे देखील अनेकांचं आरोग्य सुधारत नाहीत. यामध्ये विविध कारणं असू शकतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर व्यक्ती त्याच्या ब्लड ग्रुपप्रमाणे डाएट घेईल तर याचा त्याच्या आरोग्यावर नक्कच चांगला परिणाम होईल. ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते.
WebMDच्या अहवालानुसार, प्रत्येक ब्लडग्रुपचं विशिष्ट स्वरूप असतं. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीचा थेट संबंध ब्लड ग्रुपशी येतो. रक्त गटांचे चार प्रकार आहेत: ओ, ए, बी आणि एबी. जाणून घेऊया कोणत्या ब्लड ग्रुपने कसा आहार घेतला पाहिजे.
ओ ब्लड ग्रुप
या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी हाय प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. यामध्ये डाळ, मांस, मासे, फळं यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. त्याचप्रमाणे धान्य आणि बीन्सचाही समावेश असला पाहिजे.
A ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी काय खावं
ए रक्तगट असलेल्या लोकांनी हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त त्यांच्या आहारात टोफू, सीफूड आणि विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करावा. त्याचप्रमाणे ऑलिव्ह ऑईल, डेअरी उत्पादनं, मका आणि सीफूडसह याचं चांगलं कॉम्बिनेशन बनवू शकता.
A ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी काय खाऊ नये
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ए रक्तगटाच्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. तज्ज्ञ अशा लोकांना मांसमुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. कारण या व्यक्तींचं शरीर सहजपणे मांस पचवू शकत नाही, म्हणूनच या लोकांना कमी चिकन-मटण खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
B ब्लड ग्रुप
बी ब्लड ग्रुपच्या व्यक्ती खाण्याच्या बाबतीत नशीबवान मानल्या जातात. या व्यक्ती हिरव्या पालेभाज्या, फळं, मासे, मटण तसंच चिकन हे सगळे पदार्थ खाऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे या व्यक्तींची पचन तंत्र चांगली आहे. ज्यामुळे यांच्या शरीरात फॅट जमा होत नाही.
AB ब्लड ग्रुपमधील व्यक्तींनी संतुलित आहार घ्या
AB ब्लड ग्रुप फार कमी लोकांमध्ये पहायला मिळतो. या व्यक्तींनी फळं आणि भाज्या अधिक प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत.
वाढत्या वयानुसार, काही लोकांना उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब किंवा मधुमेह सारख्या समस्या जाणवू शकतात. अशा परिस्थितीत, सर्व रक्त गटांतील लोकांनी आहाराबद्दल एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञ वैद्यकीय स्थितीवर आधारित योग्य आहार सुचवू शकतात.