Cooking Hacks In Marathi: आजच्या यंत्रयुगात आपण आपल्या जीवनात खूप मशीन्स आणि उपकरणे वापरतो. आपली सगळे कामे यंत्राच्या माध्यमातून खूप सोपी झाली आहे. जसे की फ्रिजमध्ये धान्य ठेवणे, ताज्या भाज्या ठेवणे, वाटण करुन ठेवणे. खाण्याच्या वस्तू टिकवून ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करत असतो. त्यामुळे त्या ताज्या राहतात असे मानले जाते. तर दुसरीकडे उकडलेली भाजी, मळलेले पीठ असे अनेक पदार्थ उरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून ते पुन्हा वापरण्याकडे गृहिणींचा कल जास्त असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा चपात्या करताना मळलेले पीठ उरते. हे उरलेले पीठ गृहिणी फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्या पिठाच्या चपात्या तयार करतात. तसेच जॉब करणाऱ्या महिला वेळेची बचत करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. गरज असेल तेव्हा फ्रिजमधील पिठाचा वापर करतात. मात्र या सवयीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी पीठ फ्रिजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे. 


फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवण्याची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पाहिजे. कारण त्यामध्ये रासायनिक बदल होतात. आणि हेच बदल आरोग्यासाठी घातक ठरतात. अशा पिठाची चपाची खाल्लास आजारपण येऊ शकते. 


मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवू का नये?


आयुर्वेदात स्पष्टपणे सांगितले आहे की, फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवू नयेत. शिळ्या पिठापासून बनवलेल्या चपातीची चव ताज्या पिठापासून बनवलेल्या चपातीपेक्षा वेगळी असते.


फर्मेंटेशनची प्रक्रिया


ओल्या पिठात आंबण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे पिठात अनेक प्रकारचे जीवाणू आणि घातक रसायने तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी जबाबदार असतात. या पासून तयार केलेल्या चपात्या खाल्ल्याने पोटाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.


पोट बिघडणे


शिळ्या पिठापासून तयार केलेले चपात्या, पुऱ्या किंवा पराठा हे शिळे असतात. त्यामुळे त्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते ज्या शिळ्या चपात्या खाल्ल्याने होतात. विशेषतः पोटदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होतो. 


बद्धकोष्ट


गव्हाचे पीठ पचण्यासाठी जड असते. ज्या बद्धकोष्टाचा सामना करावा लागतो त्यांना चपात्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. शिळा चपात्या खाल्ल्याने केवळ सामान्य लोकांनाही बद्धकोष्टाची समस्या होऊ शकते.


 


 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)