मुंबई : देशात मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) संपुष्टात येणार आहे. गणितीय मॉडेलच्या आधारावर कानपूर IIT चे प्राध्यापक मनींद्र अग्रवाल (Manindra Agarwal) यांचा दावा. जगभरात धुमाकूळ घालणारी कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार, याचं उत्तर आता मिळालं आहे. मार्च अखेर तिसरी लाट ओसरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. नक्की कधी आणि कशी ही कोरोनाची तिसरी लाट ओसणार हे आपण पाहुयात. (corona 3rd wave will be end till march 2022 claim kanpur iit professor maninder agarwal)
 
दोन वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या कोव्हिड 19 व्हायरसनं देशात तिसरी लाट आणली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो ही तिसरी लाट कधी संपणार? याचं दिलासादायक उत्तर समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनींद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारावर कोरोनाची लाट केव्हा संपुष्टात येईल याचा अंदाज व्यक्त केला आहे.


आणखी एक महिना कोरोनाचा कहर पाहायला मिळेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या सर्वोच्च आकडा गाठेल. त्यावेळी देशात ८ लाखांहून जास्त रुग्णसंख्या असेल. नव्या रुग्णांच्या संख्येत 15 फेब्रुवारीपासून घट व्हायला सुरुवात होईल. मुंबई आणि दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळेल. 


ज्या वेगानं कोरोनाची तिसरी लाट पसरली त्याच वेगानं ती परतही जाईल.मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत तिसरी लाट ओसरलेली असेल, असं भाकीत अग्रवाल यांनी केलं आहे.


मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं शिखर गाठल्याचा दावा कोरोना टास्कफोर्सच्या डॉक्टरांनीही केलाय. मुंबईत कोरोना स्थिर झालाय किंवा घटतोय, असं चित्र आहे. पण आठवडाभरात आणखी चित्र स्पष्ट होईल. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनची लाट कोसळली, तसंच आपल्याकडेही होईल, असा अंदाज आहे.


ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा विषाणू आहे. तो संपल्यावर कोरोनाचा द एण्ड होईल, असं अनुमानही काही तज्ज्ञांनी वर्तवलंय. ते खरं ठरावं आणि लवकरात लवकर हे संकट संपाव, ही अपेक्षा.