Corona New Variant Deltacron | कोरोनाचा नवा स्ट्रेन डेल्टाक्रॉन किती धोकादायक?
डेल्टाक्रॉन (Corona New Variant Deltacron) व्हेरिएंट डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मिश्र स्वरुपाचा असल्याचं म्हंटलं जात आहे.
मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईसह राज्यात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांच्या चिंतेतही भर पडली. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट सापडला आहे. साईप्रसच्या वैज्ञानिकाने कोरोनाच्या या नवा व्हेरिएंट शोधून काढला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मिश्र स्वरुपाचा असल्याचं म्हंटलं जात आहे. 'डेल्टाक्रॉन' (Corona New Variant Deltacron) असं या नव्या व्हेरिएंटचं नामकरण करण्यात आलं आहे. (corona new variant deltacron know how dangerous is corona new strain deltacron)
ओमायक्रॉनच्या संसर्गाचा फैलाव हा वेगाने होत असल्याचं म्हंटलं जात आहे. तर डेल्टाने गेल्या वर्षी कहर केला होता. यामुळे दोन्ही व्हेरिएंटचं मिश्र गुणधर्म असलेला हा व्हेरिएंट किती धोकादायक असणार, याचा अंदाज लावता येईल.
साईप्रसच्या संशोधकाने या आठवड्यात डेल्टाक्रॉनबाबतचे सर्व निष्कर्ष जीआयएसएआयडीला (GISAID) पाठवले आहेत. जीआयएसएआयडी व्हायरसला ट्रॅक करण्याचं काम करतं. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत साईप्रसला डेल्टाक्रॉनची 25 प्रकरणं मिळाली आहेत. मात्र कोणत्याही देशाने याबाबतची पुष्टी केलेली नाही.
"रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्यूटेशनची तीव्रता जास्त होती. हे नवा व्हेरिएंट आणि रुग्णालयात दाखल होण्यादरम्यान संबंध असल्याचं संकेत देतात", असं सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रियाकिस यांनी स्पष्ट केलं.
डेल्टाक्रॉन डेल्टापेक्षा किती वेगळा?
या नवीन व्हेरिएंटची जनुकीय पार्श्वभूमी डेल्टासारखीच आहे. यासोबतच त्यात ओमायक्रॉनचे काही म्यूटेशनही आढळले आहेत. "सध्या या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करण्याची गरज नाही", असं सायप्रसचे आरोग्यमंत्री मिचलीस हादजीपांडेलास यांनी स्पष्ट केलं.
काही विषाणूतज्ज्ञांनुसार, डेल्टाक्रॉन हा काही नवा व्हेरिएंट नाही. "डेल्टाक्रॉन हा घातक नाही", असं बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्राध्यापक सुनीत सिंह यांनी नमूद केलं.