मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे रूग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. हे लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाने कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. याबाबत काही सूनचा केल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला सलग 3 दिवस ताप येत नसेल आणि त्याने होम क्वांरटाईनचे 10 दिवस पूर्ण केले असेल तर तो घराबाहेर पडू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- जे लोकं होम आयसोलेट आहेत. त्यांनी सोशल डिस्टंन्स ठेवलं पाहिजे. विशेषत: वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्री, मुले आणि घरात आजारी व्यक्तीपासून दूर रहा.


- संसर्गित व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या विवाह आणि इतर समारंभात उपस्थित राहू नये.


- संक्रमित व्यक्तीला घरात पिण्याचे पाणी, काचेचा ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल वेगळे देण्यात यावेत. घरातील इतर सदस्यांनी त्या वस्तू वापरु नयेत.


- घरात मास्क वापरावा. दर 6 ते 8 तासांनी मास्क बदलावा. जुन्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी.


- एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीसोबत घरात असेल तर त्यांनी त्याच्यापासून 1 मीटरतं अंतर ठेवलं पाहिजे. मास्क वापरणे अनिवार्य


- संक्रमित व्यक्तीच्या खोलीची स्वच्छता योग्य प्रकारे केली पाहिजे. तसेच, खोलीतील सर्वकाही निर्जंतुक करा.


- संक्रमित व्यक्तीने स्वतः वापरलेले कपडे धुतले पाहिजे. साबण आणि वॉशिंग पावडरने कपडे धुवावे.


- संक्रमित व्यक्तीच्या खोलीत साफसफाई करताना हातमोजे घाला. खोली स्वच्छ केल्या नंतर हात स्वच्छ करा.


- संक्रमित व्यक्तीने नियमित वेळेत साबण आणि सेनिटायझरने हात धुवावे.


- संक्रमित व्यक्तीला कमीतकमी 14 दिवस घरातच राहावे लागते. पण सतत 3 दिवस ताप येत नसेल आणि इतर कोणताही त्रास नसेल तसेच इतरांना संक्रमित करणार नसेल तर 10 बाहेर पडू शकतो.



कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरचा सल्ला आधी घ्या.