दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा वेग वाढताना दिसतोय. राष्ट्रीय राजधानीत संसर्गाचा दर 15 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे, जो गेल्या साडे सहा महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. कोरोनाचे नवीन रुग्णही गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक आहेत. तसंच सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांच्या पुढे गेली आहे. 7 ऑगस्टपर्यंत दिल्लीत 8045 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रविवारी संसर्गाचे प्रमाण वाढून 14.97 टक्के झाले आहे, त्यापूर्वी 22 जानेवारी रोजी 16.36 टक्के संसर्ग दर होता. गेल्या 24 तासांत 2423 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी 3 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक आहे. 3 फेब्रुवारी रोजी 2668 रूग्ण दाखल झाले. याशिवाय 2 रुग्णांनाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


10 दिवसांपूर्वी 7.36% पॉझिटीव्हीटी रेट


ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे 3771 सक्रिय रुग्ण वाढले आहेत. 1 ऑगस्टपर्यंत दिल्लीत 4274 सक्रिय प्रकरणं होती, जी 7 ऑगस्टपर्यंत 8045 झाली आहेत. म्हणजेच 10 दिवसात संसर्गाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाली. 29 जुलै रोजी संसर्ग दर 7.36% होता, जो 7 ऑगस्टपर्यंत वाढून सुमारे 15% झाला आहे.