पंकजा मुंडेंची संपत्ती किती? पाच वर्षात किती वाढली कुटुंबाची मालमत्ता?

प्रतिज्ञापत्रात पंकजा यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढलेली आहे.   

Jul 03, 2024, 16:02 PM IST

विधानपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीची यादी जाहीर झाली आहे.  

1/8

भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंना पक्षाकडून हिरवा कंदील दिला.त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे.   

2/8

विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पंकजा यांच्याकडे एकूण स्थूल मुल्य 6 कोटी 8 लाख 15 हजार रुपये आहे.   

3/8

पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे यांची एकूण स्थूल मालमत्ता 10 कोटी, 49 लाख 34 हजार  813 रुपये इतकी आहे.   

4/8

पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी असल्याचे सांगितले आहे. 

5/8

पंकजा यांनी  लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहिर केलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार, पंकजा आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्यावर 9 कोटी 84 लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं गेलं. 

6/8

पंकजा यांचे बँकेत कागदपत्रे आणि शेअर्स आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. 

7/8

पंकजा यांच्याकडे  450 ग्रॅम सोने असल्याची माहिती आहे. ज्याची किंमत3 लाखाच्या  जवळपास असल्याची माहिती आहे. 

8/8

त्याशिवाय चार किलो चांदीची त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. पंकजा यांनी दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक सुमारे 32 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितले गेले.