Corona Update : `या` तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी सुरु होणार `बूस्टर डोस`
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
Corona Update : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. १८ वर्षावरील सर्वांना आता कोविड-१९ चा बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात येणार आहे. 10 एप्रिलपासून बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
याआधी व्याधी ग्रस्त, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती.
10 सरकारी लसीकरण केंद्रांबरोबरच खासगी लसीकरण केंद्रावरही बूस्टर डोस देण्यात येणार आहे.