Long Covid Symptoms : तुम्हाला Corona होऊन गेलाय का? ही लक्षणं अजुनही दिसतायत का? सावध व्हा!
ही बातमी लक्षपूर्वक वाचा
Which variant is more likely to Cause Long Covid: भारतात कोरोना संसर्गाचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. थोडक्यात संसर्ग पुन्हा एकदा फोफावण्यास सुरुवाच झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातून हजारो नवे कोरोना रुग्ण निदर्शनास येऊ लागले आहेत. अर्थात इथं रिकव्हरी रेट/ रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के असल्यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.
कोविडमधून अनेकजण सावरत असले तरीही अशा बऱ्याचजणांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाँग कोविड (Long Covid) अशा शब्दांत या स्थितीचं वर्णन करण्यात येत आहे.
कोणता कोरोना व्हॅरिएंट सर्वात घातक?
किंग्स कॉलेज लंडन, इथं करण्यात आलेल्या निरीक्षणातून डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) च्या तुलनेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हॅरिएंट अधिक घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हॅरिएंटनं कोरोनाची लक्षणं दीर्घकाळ तुमच्या शरीरात दिसू शकतात.
काय आहेत या लाँग कोविड (Long Covid) ची लक्षणं?
थकवा, श्वास घेण्यात अडचण, एकाग्रतेमध्ये कमतरता, डोकेदुखी, सांधेदुखी अशा लक्षणांचा लाँग कोविड (Long Covid) मध्ये समावेश आहे.
ब्रेन फॉग, सुन्नता, झिणझिण्या, आतड्यांच्या समस्या, निद्रानाश, चक्कर येणं, कान ठणकणं आणि धुसर दिसणं अशा लक्षणांनाही लाँग कोविड (Long Covid) मध्ये गणलं गेलं आहे.
कोरोनातून सावरल्यानंतरही 15 महिन्यांनीसुद्धा रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाच्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या लक्षणांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणं सर्वसामान्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोरोनातून सावरलेल्या 85 टक्के रुग्णांमध्ये यापैकी काही लक्षणं दिसून आली आहेत. थोडक्यात कोरोनानं आपली पाठ अजूनही सोडलेली नाही, हेच स्पष्ट होत आहे.