मुंबई : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राजधानीत गेल्या 24 तासांत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत 2136 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे, मुंबईतही 1 जुलैनंतर कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसून येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 2136 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8343 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, पॉझिटीव्हीटी दर देखील 15.02 टक्क्यांवर गेला आहे. यादरम्यान 2623 रुग्ण बरेही झाले आहेत.


मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 871 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, जी 1 जुलैपासूनची सर्वाधिक कोविड-19 प्रकरणं आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच शहरातील एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार, शहरातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,30,839 झाली आहे, तर मृतांची संख्या 19,663 वर पोहोचली आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी मुंबईत 852 रुग्ण आढळले होते, तर 11 ऑगस्ट रोजी 683 रुग्णांमध्ये कोरोनाची नोंद झाली होती आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.