मुंबई: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा काळजी घेण्याचं आणि बेफिकिरीने न वागण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 24 तासांत 17073 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सक्रिय रुग्णांची संख्या 94,420 झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. गेल्या एका आठवड्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 


सर्दी, खोकला, श्वसनासाठी त्रास होणं, घशात खवखव होणं आणि ताप ही कोरोनाची पहिली लक्षणं आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका असं सांगितलं जातं. मात्र आता पोटोशी संबंधीत तीन लक्षणं समोर आली आहेत. कोरोना व्हायरस थेट तुमच्या पोटातील पचनक्रियेवर हल्ला करतो. 


एका अहवालानुसार 206 कोरोना रुग्णांपैकी 48 रुग्णांना पचनक्रियेशी संबंधित त्रास जाणवला. 69 रुग्णांना पचनाचा आणि श्वसनाचा त्रास जाणावला आहे. त्यामुळे एकूण 117 रुग्णांना पोटाशी संबंधित त्रास झाल्याचं समोर आलं आहे. 


डायरिया, भूक न लागणं आणि असह्य पोटदुखीचा त्रास जाणवतो. ही तिन्ही लक्षणं असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तातडीने चाचणी करून घ्यायला हवी. ही लक्षणं कोरोनाची आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना ताप-सर्दी खोकला या व्यतिरिक्त आता पचनक्रिया आणि पोटदुखीचे त्रास सुरू झाले आहेत. कोरोना आता पचनक्रियेवर हल्ला करत आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.