मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. भारतातही 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. वर्क फ्रॉम होममुळे, सतत एका जागी बसून किंवा सतत लॅपटॉप स्क्रिनसमोर बसून अनेकांना आरोग्यासंबंधी तक्रारी, समस्या होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने work from home करताना काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहे.


वर्क फ्रॉम होम करताना अशी काळजी घ्या -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- वर्क फ्रॉम होम करताना एकाच जागेवर, एकाच पोझिशनमध्ये बसू नका.
- प्रत्येक 30 मिनिटांनी उठून, कमीत कमी 3 मिनिटांपर्यंत शरीर स्ट्रेच करा.
- अधिक वेळापर्यंत कंप्युटर किंवा लॅपटॉप स्क्रिनसमोर बसू नका.
- 15 ते 20 मिनिटांनी स्वच्छ हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवा. असं करण्याने डोळ्यांची जळजळ होण्याची समस्या कमी होऊ शकते.



Lockdown : सतत लॅपटॉपवर काम करताय? तर हे एकदा वाचा...



घरीच स्वत:ला ऍक्टिव्ह ठेवा -


- शरीर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पायऱ्यांवर वर-खाली करा. पायऱ्यांवर असं केल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मांसपेशी मोकळ्या होण्यास मदत मिळेल.
- शरीर ऍक्टिव्ह राहण्यासाठी व्यायाम करा.
- आपल्या आवडत्या गाण्यावर थोडा वेळासाठी डान्स करा.
- दोरीच्या उड्या मारा
- वर्क फ्रॉम होम करताना जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा शरीर स्ट्रेच करा.