कृष्णात पाटील / मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली तर मृत्युचेही प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. आता  लसीकरणानंतर दोन प्रकारच्या अँटिबॉडीज (Corona antibodies) तयार होतात, हे अभ्यासात पुढे आले आहे.  बायडिंग अँटिबॉडीज आणि न्यूट्रीलायझिंग अँटिबॉडीज. बायडिंग अँटिबॉडीज नसलेल्यांमध्येही न्यूट्रीलाईझिंग अँटिबॉडीज असतात. लसीकरणानंतर न्यूट्रीलाईज अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. 20 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत अँडिबॉडीज मिळाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरण झालेल्यांमध्ये  20 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत  न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडीजचे प्रमाण दिसून आले आहे. नायर रूग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या अभ्यासातील निष्कर्ष आहे. दोन्ही डोस घेतलेल्या 60 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अँटीबॉडीजचा अभ्यास केला. त्यानंतर कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरणातून पुरेशा प्रमाणात न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडीज तयार झाल्याचे समोर आहे.


दुसरा डोस घेतल्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतर करण्यात तपासणी आली. आणखी दोन महिन्यांनी त्याच 60 जणांमधील अँटीबॉडीज तपासणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाच्या  सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ जयंती शास्त्री यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, लसीकरणानंतर दोन प्रकारच्या अँटिबॉडीज तयार होतात. बायडिंग अँटिबॉडीज व न्युट्रीलायझिंग अँटिबॉडीज. बायडिंग अँटिबॉडीज नसलेल्यांमध्येही न्यूट्रीलाईझिंग अँटिबॉडीज असतात. - लसीकरणानंतर न्युट्रीलाईज अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. 20 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत  अँडिबॉडीज मिळाल्या. 


 दुसरा डोसच्या तीन आठवड्यांनी आम्ही ही तपासणी केली होती. पुन्हा दोन महिन्यांनी आम्ही बघणार आहोत. याच अँटिबॉडीज तुम्हाला कोरोना संसर्गापासून वाचवणार. किमान तुम्ही गंभीर तर होणार नाही.   लसीकरणामुळं म्युटेड व्हायरसही न्युट्रलाईज होतो. दुसऱ्यांदा कोरोना झाला तरी गंभीर होणार नाही, असे डॉ जयंती शास्त्री यांनी सांगितले.
 
कोविड झालेल्यांमध्ये तीन प्रकारच्या अँटिबॉडीज असतात. कोरोना झालेल्यांमध्ये सहा ते आठ महिन्यांपर्यंत अँटिबॉडीज असतात. टी सेल्स मेमरीही महत्वाच्या असतात. लसीकरणाचा परिणाम किती काळ टिकेल हे बघावे लागेल. टी सेल्स इम्युनिटी किती आहे ते रिसर्च करण्यासाठी टाटा सन्सने फंडिंग केले आहे.