मुंबई : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे की, कोविड मृत्यू म्हणून कधी विचार केला जाईल? आरोग्य मंत्रालय आणि ICMRने कोविड मृत्यू प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याची माहिती सरकारने दिली आहे. याअंतर्गत, अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या 30 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास, तो कोविड मृत्यू मानला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर आरटीपीसीआर, आण्विक, रॅपिड एंटीजेन किंवा इतर कोणत्याही चाचणीद्वारे संसर्गाची पुष्टी झाली तर ते कोविड प्रकरण मानलं जाईल. सरकारने सांगितले आहे की, ICMR अभ्यासातून असं दिसून आले आहे की, अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या 25 दिवसांच्या आत 95% मृत्यू होतात.


कोविडने मृत्यू झालाय असं कधी मानण्याच येईल. यावर, सरकारने म्हटलंय, "जर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 30 दिवसांच्या आत एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तो कोविड मृत्यू मानला जाईल. मग तो मृत्यू रुग्णालयात किंवा घरी झाला असावा. 


दरम्यान सरकारने असंही म्हटलं आहे की, जर 30 दिवसांनंतर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तो देखील मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविड मृत्यू म्हणून गणला जाईल.


मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू विष, आत्महत्या, हत्या किंवा कोणत्याही अपघातामुळे झाला तर त्याला कोविड मृत्यू मानला जाणार नाही.


सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, "जर कोरोना रुग्ण घरी किंवा रुग्णालयात मरण पावला, तर जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 अंतर्गत  येणारे फॉर्म-4 आणि 4ए जारी करण्यात येईल. ज्यामध्ये मृत्यूचं कारण कोविड -19 मृत्यू असे लिहिलेलं असेल.


सरकारने सांगितले की, भारताचे रजिस्ट्रार जनरल लवकरच सर्व राज्य आणि चीफ रजिस्ट्रार आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील.