गायत्री पिसेकार, झी मीडिया : Pad Vs Tampons : आपल्या देशात तसं टॅम्पून्स वापराचं प्रमाण फार कमी आहे. त्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. टॅम्पून्स वापराविषयी महिलांमध्ये जागृती ( use of tampons) होणं गरजेचं आहे. तसेच टॅम्पून्सचे दर सॅनिटरी पॅड्सच्या तुलनेत (sanitary pads) जास्त आहेत. मात्र, टॅम्पून्सच्या वापराने लिकेजेस सारख्या समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर महिन्याला पाळी ( Periods) येणे ही नैसर्गिक बाब आहे. मात्र, पाळीच्या दिवसातील अधिक रक्तस्त्रावामुळे महिलांच्या रोजच्या जिवनातील शारिरीक हालचालींवर मर्यादा येतात. तसेच सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे लिकेजमुळे (sanitary pads leaks) कपडे डागाळण्याचं टेन्शन प्रत्येक महिलेला असतं. 
शारिरीक स्वच्छतेचा विचार करून दर 4-5 तासाला सॅनिटरी पॅड बदलणं आणि त्या पॅडची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं किंवा 
पॅड कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकणं हा सगळा त्रासदायक प्रकारातून प्रत्येक महिलेला जावंच लागते. मात्र, टॅम्पून्सच्या वापराने या त्रासापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते. 


हेही वाचा : Coffee चे सेवन या लोकांनी अजिबात करु नये, ठरु शकते हानिकारक


वयाच्या कितव्या वर्षापासून मुली टॅम्पून्सचा वापर सुरु करू शकतात? (When To Use Tampons)


टॅम्पून्स वापरणं न वापरणं हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. पाळी यायला सुरुवात झाल्यापासून मुली टॅम्पून्स वापरू शकतात. टॅम्पून्स वापरणं हे तुमच्या किती सोयीचं आहे त्यावर हे अवलंबून आहे. टॅम्पून्स वापरून तुम्ही सर्व प्रकारच्या शारिरीक हालचाली (Physical Activity) करू शकता.  सॅनिटरी पॅड लावून स्विमींग करणं अशक्य असतं. मात्र,  टॅम्पून्स वापरून स्विमींगही करता येऊ शकतं. 


योग्य टॅम्पून कसं निवडावं? ( How To Select Tampons)


  • पहिल्यांदाच टॅम्पून वापरणार असाल तर लाईट फ्लो टॅम्पून ( Light Flow Tampons) निवडणं योग्य असेल जे आकाराने लहान आणि इन्सर्ट करायला सोप्पं असतं.

  • एकदा तुम्हाला टॅम्पून वापरून अंदाज आला की पाळी दरम्यान होणारा रक्तस्रावानुसार तुम्ही रेग्युलर किंवा हेवी फ्लो टॅम्पून ( Regular flow and heavy flow tampons)  निवडू शकता.


टॅम्पून्सचे प्रकार जाणून घेऊया ( Types of Tampons )


  • नो अॅप्लीकेटर टॅम्पून: हे टॅम्पून्स अॅप्लिकेटरशिवाय येतात आणि तुमच्या बोटांनी इन्सर्ट करावे लागतात. ( no applicator tampons ) 

  • कार्डबोर्ड अॅप्लीकेटर टॅम्पून: हे टॅम्पून्स कार्डबोर्डपासून बनवलेल्या ऍप्लिकेटरसह येतात. मात्र, पहिल्यांदाच टॅम्पून्स वापरत असाल तर थोडे त्रासदायक ठरू शकतात. ( Cardboard applicator tampons) 

  • प्लॅस्टिक अॅप्लीकेटर टॅम्पून: प्लास्टिक ऍप्लिकेटरसह मिळणारे टॅम्पून्स वापरण्यास सोप्पे असतात आणि योनीमध्ये सहजपणे सरकतात. ( Plastic applicator tampons)


हेही वाचा : पचनाची समस्या? हे फळं म्हणजे पचनावर सिक्रेट औषध, नावं आणि फायदे जाणून घ्या


टॅम्पून्स कसे वापरावे? ( Using Tampons for first time)


पहिल्यांदा टॅम्पून्स वापरणं सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं. मात्र, एकदा वापरल्यावर टॅम्पून्स इंन्सर्ट केल्याचं जाणवतं ही नाही. आता टप्प्याटप्पाने जाणून घेऊया टॅम्पून्स ( How to Import tampons ) कसं इंन्सर्ट करायचं?


  • सुरुवातीला छोट्या आकाराचं टॅम्पून निवडा.

  • शांतपणे हलकेच टॅम्पून योनीत इंन्सर्ट करा.

  • टॅम्पूनची दोरी हलक्या हाताने बाहेरच्या बाजूला खेचा. दोरी खेचल्यावर टॅम्पून योनीमध्ये उघडलं जाईल.

  • योनीमधून फक्त टॅम्पूनची दोरी बाहेरील बाजूस ठेवा. जेणेकरून तुम्हाला साधारणत: 4 तासानंतर टॅम्पून बाहेक काढणं सोप्पं जाईल.

  • साधारणत: 4-5 तासानंतर टॅम्पून बदलण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.


correct age of using tampons and simple tips to use tampoons