Medical Test for Couples : लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही निकष कायम अंदाजात ठेवले जातात. जोडीदाराच्या नोकरीपासून ते त्याच्या स्वभावापर्यंत सर्व मुद्दे यावेळी गांभीर्यानं पाहिले जातात. अगदी आम्ही ग्रह ताऱ्यांमध्ये रमत नाही म्हणणारेही कुंडली पाहून मनातल्या शंका दूर करतात. यामध्ये वैद्यकिय चाचण्यांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. वधू- वराच्या भवितव्यासाठी या चाचण्या अतिशय गरजेच्या असतात. ज्यामुळं भविष्यात तुम्हाला संकटांचा सामना करता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लड ग्रुप टेस्ट (Blood Group Test): रक्तगट आणि रक्त तपासणी करणं कधीही उत्तम. यामध्ये लक्ष देण्याजोगा घटक म्हणजे आरएच. पती आणि पत्नीचा आरएच मेळ खात नसेल तर पुढे बाळाच्या जन्मात बऱ्याच अडचणी उदभवतात. 


जीनोटाइप टेस्ट (Genotype Tests): आई- वडिलांचे Gene मुलांमध्ये जात असतात. अशा वेळी लग्नाच्या आधी जीनोटाइप टेस्ट करणं कधीही फायद्याचं. जेणेकरुन काही अडचण असल्यास त्याची पूर्वसूचना लगेचच मिळेल. 


कम्पलीट ब्लड काउंट (CBC Test): कोणत्याही व्यक्तिच्या आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी सीबीसी टेस्ट जरुर करावी. यामुळं अॅनिमिया, इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन, ब्लीडिंग डिसऑर्डर किंवा ल्यूकेमिया अशा आजारांची माहिती मिळते. 


थैलेसीमिया- हीमोफीलिया टेस्ट (Thalassemia-Haemophilia Test): थैलेसीमिया -हीमोफीलिया भविष्यात मुलांवर वाईट परिणाम करु शकतात. त्यामुळं लग्नाआधी ही चाचणी करणं टाळू नये. 


अधिक वाचा : Girls Talks: टॅम्पून्स वापरण्याचं योग्य वय काय? Tampons टॅम्पून्स वापरायच्या सोप्या टीप्स


मानसिक आरोग्य (Mental Health Status): सुखी वैवाहिक आयुष्यासाठी दोन्ही जोडीदारांचं मानसिक आरोग्य सुस्थितीत असणं गरजेचं असतं. त्यामुळं त्याबाबत सर्व माहिती असण्यात गैर काहीच नाही. 


फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test): लग्नानंतर अधिकांश जोडपी बाळाला जन्म देऊ पाहतात. पण, यासाठी भविष्या हिरमोड होऊ नये यासाठी सुरुवातीलाच फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) करणं फायद्याचं. 


एचआईवी आणि एसटीडी टेस्ट (HIV and STD Test): हे असे आजार आहेज जे सहजपणे शारीरिक संपर्कातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमित होतात. त्यामुळं तुमच्या जोडीदारालाही असा कोणता आजार नाही याची पूर्वकल्पना असूद्या. 


(वरील संदर्भ फक्त माहिती देण्याच्या उद्देशानं लिहिण्यात आली आहे. निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)