मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण सुरु झालं असून लस घेणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत शक्य तितक्या अधिक लोकांना लस0 देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अशातच भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या किंमतीबाबत वाद निर्माण झाला आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत बायोटेकचा असा दावा आहे की, सरकारच्या आदेशानुसार ते एकूण उत्पादनापैकी केवळ दहा टक्के उत्पादन खासगी कंपन्यांना विकत आहेत. ज्यामुळे त्याला लसची सरासरी किंमत केवळ 250 रूपये मिळत आहे. कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की, सरकार 90 टक्के साठा 150 रूपे प्रति लस खरेदी करत आहे. ही अत्यंत कमी किंमत आहे. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राला महाग लस विकल्याशिवाय पर्याय नाही.


सध्या खासगी रूग्णालयात 1410 रुपयांमध्ये कोवॅक्सिन लस देण्यात येतेय. भारतातील खासगी रुग्णालयात विकली जाणारी ही सर्वात महाग लस आहे. दरम्यान, भारत बायोटेक यांनी स्पष्टीकरण दिलंय की, आतापासून या लसीचा 25 टक्के हिस्सा खाजगी कंपन्यांना विकला जाईल.


भारत बायोटेकने हे उदाहरण देत स्पष्टीकरण दिलं की, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लस सरकारला 2500 रूपयांमध्ये विकली जाते. तर बाजारात त्याची किंमत प्रति डोस 500 रूपये आहे. त्याचप्रमाणे, रोटा व्हायरसची लस भारत सरकारला प्रति डोस 60 रूपयाने दराने विकली जाते, तर बाजारात त्याला प्रति डोस 1700 रुपये मिळतात.


भारत बायोटेकच्या म्हणण्याप्रमाणे, उच्च दराच्या नावाखाली जर अशाच टीका केल्या गेल्या तर भारतात शोध लावणं आणि स्वतःची लस बनवणं फार कठीण होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 40 दशलक्ष डोस बनवले आहेत.