Corona XE virus Symptoms : काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. देशांतील वाढती प्रकरणे ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्‍या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1  आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) धोक्याचा इशारा देत आहे. हा नवीन प्रकार 10 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (corona xe verient found in mumbai)


XE व्हेरिएंटची मुंबईत धडक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मुंबईत देखील याचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. भारतात कोरोनाचे नवीन प्रकार XE चे पहिले प्रकरण मुंबईत आढळून आले आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, 230 नमुन्यांमध्ये 228 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. एक केस फास्ट स्प्रेडिंग XE प्रकाराचा आढळला आणि दुसरा केस कापा प्रकाराचा होता.


कोरोनाचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. ताप, खोकला, थकवा, चव ओळखता न येणे किंवा कोणताही तीव्र वास इत्यादींचा सामान्य लक्षणं आतापर्यंत रुग्णांमध्ये दिसत होती. पण आता यामध्ये नवीन लक्षणांचा देखील समावेश झाला आहे.


कोरोनाशी संबंधित 9 नवीन लक्षणे


भूक न लागणे
घसा खवखवणे
डोकेदुखी आहे
अंग दुखी
थकवा जाणवणे
अतिसार होणे
आजारी वाटणे
धाप लागणे
नाक गळणे 


वर नमूद केलेली ही लक्षणे कोरोना संसर्गाच्या अधिकृत लक्षण यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा त्या व्यक्तीने घरीच थांबावे. त्याच वेळी, कोणताही विलंब न करता, डॉक्टरांशी संपर्क साधावा.


कोरोनाच्या या लक्षणासह ब्रेन फॉग, डेलेरियम, भीती वाटणे आणि त्वचा संदर्भातील समस्या देखील रुग्णांमध्ये दिसले आहेत.