Child Born in Covid19 News IN Marathi : चार वर्षापूर्वी म्हणजेच कोविड काळात  देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत होता. प्रत्येक घर कोरोनानाचे रुग्ण दिसायचे. तसेच कोरोना आणि त्याच्या सबव्हेरियंटमुळे हजारो लोकांचे प्राण गेले. यामध्ये तर डेल्टा व्हेरियंटने तर कहर केला होतो. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकजण एकटे राहायला शिकले. त्याचे दुष्परिणाम असे आहेत की काही लोक मानसिक आजारांच्या विळख्यात सापडले. असे असताना एका संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. मात्र या काळात जन्मलेल्या मुलांमध्ये रोगांशी लढण्याची जबरदस्त शक्ती असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊन दरम्यान जन्माला आलेल्या मुलांना क्वचितच आजार होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. इतर काळात जन्मलेल्या मुलांपेक्षा त्यांची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. 


आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कच्या संशोधनाच्या मते, लॉकडाऊनच्या काळात जन्मलेली मुले इतर मुलांपेक्षा वेगळी आहेत. जसे की, त्यांच्या पोटातील मायक्रोबायोम इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मुलांमध्ये ॲलर्जीची समस्या तुलनेने खूपच कमी आहे. एकंदरीत इतर मुलांच्या तुलनेत कोविड काळात जन्मलेल्या मुलांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचे दिसून आले आहे.  


मायक्रोबायोम म्हणजे काय?


मायक्रोबायोम हा सूक्ष्मजीवांचा समुदाय आहे. (जसे की बुरशी, जीवाणू आणि विषाणू) विशिष्ट वातावरणात अस्तित्वात असतात . माणसांमध्ये शब्द बहुतेकदा शरीराच्या विशिष्ट भागामध्ये किंवा त्वचेवर किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तसेच निरोगी अवस्थेत आतड्याच्या मायक्रोबायोटामध्ये असंख्य सकारात्मक कार्ये असतात, ज्यामध्ये अन्नाच्या पचण्याजोगे घटकांच्या चयापचयातून ऊर्जा पुनर्प्राप्ती, संसर्गापासून संरक्षण आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे सुधारणे इत्यादींचा समावेश आहे. 


संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, एका वर्षात कोरोना काळात जन्मलेल्या मुलांमध्ये ऍलर्जीची केवळ 5 टक्के प्रकरणे आढळून आली होती. तर पूर्वी हा आकडा 22.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. इतकेच नाही तर यापैकी केवळ 17 टक्के मुलांना वर्षभरात अँटिबायोटिक्स घ्यावी लागत होती, पूर्वी हे प्रमाण 80 टक्के होते.


मुलांना नैसर्गिक प्रतिजैविक मिळाले


लॉकडाऊन दरम्यान जन्मलेल्या मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या काळात प्रदूषणाचा अभाव आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद होते, त्यामुळे वायू प्रदूषण नगण्य होते आणि मुलांच्या फुफ्फुसात कमी कचरा आला होता.