बापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल
तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल
मुंबई : आतापर्यंत डिप्रेशन हा आजार एकलकोंड्या किंवा वयोमानानुसार होणारा असं समजलं जात होतं. मात्र कोव्हिड काळात अनेक गोष्टी समोर आल्या. अनेक तरुण मुलंही वेगवेगळ्या कारणाने डिप्रेशनमध्ये जात असल्याचं समोर आलं. आता तर जागतिक आरोग्य संघटनेनं धक्कादायक अहवालच समोर आणला आहे.
डिप्रेशनचा आता लहान मुलांनाही धोका आहे. अगदी 5 वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत डिप्रेशनचा धोका आहे. लहान मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
जगात 14 टक्के तरुण कोणत्या ना कोणत्या कारणाने डिप्रेशनचे शिकार आहेत. तर 5 ते 9 वर्षांमधील मुलांचं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण 8 टक्के आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. मानसिक आरोग्य ठिक नसल्याने लहान मुलं डिप्रेशनमध्ये जात असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांहून कमी वय असलेल्या 50 पैकी एक मुलाला डेव्हलपमेंट डिसेबिलिटीचा धोका असतो. त्यामुळे तो मानसिकरित्या आजारी होतो. त्यातून डिप्रेशनचा धोका वाढतो. याचं प्रमाण श्रीमंत देशांमध्ये 15 टक्के तर विकसनशिल देशांमध्ये 11.6 टक्के आहे.
2019 च्या अहवालानुसार 301 मिलियन लोकांना anxiety डिसऑर्डर आहे. तर 200 मिलियन लोक डिप्रेशन आजाराने ग्रासलेले आहेत. 2020 मध्ये वाढत्या कोरोनामुळे हे प्रमाणे वाढून 246 मिलियनवर पोहोचलं आहे. 1 वर्षात डिप्रेशनच्या केसेस 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.
या आजारात 52 टक्के डिप्रेशनचा धोका महिलांना तर पुरुषांना 45 टक्के धोका आहे. तर 31 टक्के लोक anxiety डिसऑर्डरने ग्रासलेले आहेत. 11 टक्के लोकांना फिजिकल डिसेबिलिटीमुळे डिप्रेशन येतं तर उरलेल्या लोकांना हे मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणांमुळे डिप्रेशन येत असल्याचं समोर आलं आहे.
डिप्रेशनमधून आयुष्य संपवण्याचं प्रमाणही वाढलं आहे. डिप्रेशनमधील 100 लोकांपैकी एक जण आयुष्य संपवण्याचा विचार करतो. 58 टक्के लोक हे 50 वर्ष पूर्ण होण्याआधीच डिप्रेशनमुळे आयुष्य संपवत असल्याचं समोर आलं आहे. मानसिकरित्या आजारी असलेल्या लोकांचं आयुष्यही 10 ते 20 वर्ष कमीच असतं असं या अहवालातून समोर आलं आहे.
मानसिक आरोग्य बिघडण्याच्या इतर प्रमुख कारणांमध्ये सामाजिक आणि आर्थिक भेदभाव, युद्ध आणि आता हवामान संकट हे देखील मानसिक आजाराचे कारण म्हणून पाहिले जात आहे. अहवालात असेही म्हटलं आहे की कोरोनाव्हायरसच्या पहिल्याच वर्षात नैराश्य आणि तणावाच्या प्रकरणांमध्ये 25% वाढ झाली.