Covid 19 Symptoms : कोरोना विषाणूपासून देशाची अद्याप सुटका झालेली नाही. पूर्वीच्या तुलनेत दिलासा मिळाला असला तरी अद्यापही या विषाणूपासून पूर्णपणे सूटका झालेली नाही. अशा परिस्थितीत आता कोरोनाचे आणखी एक नवीन लक्षण समोर आले आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात सर्दी, खोकला ही कोरोना विषाणूची लक्षणे असल्याचे सांगितले जात होते, ते टाळण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते, जेणेकरून संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये. असे असूनही, अनेक आरोग्य संस्था त्याची खरी लक्षणे शोधण्यासाठी संशोधन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोना विषाणूच्या नवीन लक्षणांबद्दल एक इशारा जारी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याबाबत सूचना जारी केली असून, कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये वास किंवा चव कमी होणे, सतत खोकला आणि थंडी वाजणे यांचा ही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय धाप लागणे, अंगदुखी, भूक न लागणे, घसादुखी, डोकेदुखी, थकवा आणि जुलाब यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.


कोरोनाचे हे लक्षण गंभीर


आतापर्यंत या यादीत समाविष्ट नसलेले लक्षण म्हणजे 'ब्रेन फॉग'. होय, WHO आणि रोग नियंत्रण केंद्र (CDC) ने आता ब्रेन फॉग याचा समावेश कोरोनाचे लक्षण म्हणून केला आहे.


जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्तीची समस्या असते तेव्हा ते दीर्घ कोविडचे लक्षण असू शकते. विचार करण्यात अडचण, लक्ष न लागणे, एखादी गोष्ट लवकर विसरणे, कोणत्याही प्रकारचा गोंधळ, मानसिक थकवा जाणवणे, याशिवाय कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करण्यास त्रास होणे ही दीर्घ कोविडची लक्षणे आहेत.