चीन : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीनमधील मोठी शहरं Shenzhen आणि Shanghai शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतायत. यामुळे दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याने चीनी प्रशासनाला चीनमधील प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करावं लागलं आहे.


वाढत्या प्रकरणांमुळे चीन प्रशासन अलर्टवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणं पाहता लोकांच्या एंटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. तर बेजबाबदारपणे वागल्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरखास्तही करण्यात आलं आहे.


एका आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर


Shenzhen शहरात एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवांशी जोडलेल्या नागरिकांना यावेळी घरीच राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तींवी पीसीआर चाचणी करून घेण्यास सांगितली आहे. शांघायमध्ये अंशिक प्रमाणात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांना शहराबाहेर न जाण्याचा सल्ला दिला गेलाय.


लोकांना केलं हे आवाहन


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे, चीनमध्ये रविवारच्या एका दिवशी कोरोनाचे 3,122 नवीन रुग्ण आढळले. तर शनिवारी 1,524 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाने कठोर नियम जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना मास्क वापरण्याचं आणि वारंवार हात धुण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.