या देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...
अपल्याकडे सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...
मुंबई : अपल्याकडे जणू एक अलिखीत नियमच आहे की, प्रेम म्हटले की ते चोरूनच करायचे. जर उघडपणे केले तर, कोणीतरी खलनायक म्हणून त्यात त्रिकोण तयार करणारच. त्यामुळे अनेकदा निष्पाप प्रेमही बदनाम ठरण्याचा धोका वाढतो. त्यात आपल्या सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, गंमत अशी की, जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांवर कोणताच राग व्यक्त करत नाही. उलट त्यांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...
सरकारी खोलीत जोडपी करणार भरूपूर प्रेम...
या शहराचे नाव आहे क्यूबा. होय, हेच ते क्यूबा, जे फिडेल कॅस्ट्रोच्या लढवय्या नेतृत्वामुळे जगाच्या नकाशावर वेगळेपणाने उठून दिसले. येथील सरकार प्रेमी युगूलांवर विशेष मेहरबाण असते. आणि प्रेमी युगालेही सरकारवर असतात भलतीच खूश. कारण, येथील सरकार प्रेमी युगूलांना खास सवलतीच्या दरात प्रायव्हेट रूम उपलब्ध करू देते. जेणेकरून प्रेमी युगूलांना आपला आनंद, प्रेम खासगीत व्यक्त करता येऊ शकेल.
बंद असलेली योजन सरकारने केली पुन्हा सुरू
सरकारची ही योजना गेली अनेक वर्षे सुरू होती. मात्र, मंध्यंतरी १९९०च्या दशकात क्यूबावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे ही योजनेला सरकारने काही काळ स्थागिती दिली होती. या योजनेला स्थगिती मिळाल्यामुळे प्रेमी युगुलांना हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये प्रायव्हेट रूम मिळविण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत असत. दरम्यान, क्यबाची राजधानी हवाना येथील प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, क्युबा सरकार ही योजना पुन्हा एकदा सुरू करत आहे. त्यासाठी देशातील हॉटेल्स पुन्हा सरकारच्या नेटवर्कमध्ये आणण्यात येईल.
बेड, एसी आणि फ्रीजसह अनेक सुविधा....
क्यूबामध्ये या प्रायव्हेट रूमला पोरासस असे म्हटले जाते. सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या या रूममध्ये एसी, फ्रीज, आरामदायी बेड आणि इतर काही सुविदा दिल्या जातात. विशेष असे की, यासाठी रूमचे भाडेही अत्यंत अल्प असे असते.