मुंबई : तुमच्या स्वयंपाक घरात वापरलं जाणारं जिरं आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं याची तुम्हाला कल्पना आहे का? आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं हे जीरं तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जिऱ्यामध्ये अँटीसेप्टीक गुणधर्म असतात ज्यामुळे जखम लवकर भरते आणि पचनसंस्थेचं कार्यही सुरळीत होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल तर जिऱ्याच्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. मात्र यासाठी योग्य पद्धतीची माहिती असणं फार गरजेचं आहे.


जिऱ्याच्या पाण्याने वजन कसं होतं कमी?


शरीराचं वजन वाढण्यामागे प्रमुख कारण हे इंफ्लामेशन मानलं जातं. हे इंफ्लामेशन शरीरातून काढून टाकण्याचं काम जिऱ्याचं पाणी करतं. यामुळे पचन कार्य सुरळीत होतं परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.


जिऱ्याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत


अनेज जिऱ्याचं पाणी पिताना चुकीची पद्धत वापरतात आणि यामुळे त्यांचा योग्य रिझल्ट मिळत नाही. जिऱ्याला केवळ पाण्यामध्ये भिजवून पिणं पुरेसं नाही. त्यापेक्षा जिरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावं आणि हे पाणी सकाळी गरम करून प्यावं. यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होईल.


ही चूक करू नका


जिऱ्याचं पाणी हे गरम पडतं. यासाठी तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, उन्हाळ्याच्या दिवसांत जिऱ्याचं पाणी पिऊ नये. खासकरून एप्रिल ते जूनच्या काळात हे पाणी पिऊ नये. 


कधीपर्यंत प्यावं जिऱ्याचं पाणी


हे जिऱ्याचं पाणी किती दिवस प्यावं यामध्ये लोकांच्या मनात संभ्रम आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही दीर्घकाळ जिऱ्याचं पाणी पिऊ शकता यामुळे कोणतंही नुकसान होत नाही.