Curd Side Effects: आपल्याला दैनंदिन आयुष्यात फीटनेसप्रमाणे आपल्या आहाराकडेही (which people should avoid eating curd) लक्ष देणे फारच गरजेचे असते. आपण काय खातो यावरही आपल्या आरोग्याचे गणित ठरते. दही हे आपल्या सर्वांच्याच आवडीचे (Curd Disadvantages for Health) असते. त्यामुळे आपल्या आहारात आपण दह्याचा हमखास समावेश करत असतो. जेवणानंतर दही अनेकांना खायला आवडते. त्याचबरोबरीनं दह्याचे अनेक आरोग्यदायी (Curd Benefits) फायदेही आहेत परंतु काही प्रकृतीच्या लोकांनी दही खाणे हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांनाही दह्याचे सेवन शक्यतो टाळावे. (curd side effects which people should avoid eating dahi health news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दह्याचे फायदे हे अनेक आहेत. आपल्या जेवणातही आपण दह्याचा वापर करतो. दही सर्व्ह केल्याशिवाय आपले अनेक पदार्थही पुर्ण होत नाहीत. व्हिटॅमिन बीची (Vitamin B) कमतरता असणाऱ्यांनी दह्याचे सेवन करावे. त्यांच्यासाठी दही उपयुक्त ठरते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक (Curd Health Properties) असतात. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6) आणि व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) असे पोषक घटक असतात. त्याचबरोबर दह्यात प्रोटीन (Protein) आणि सोडियमही (Sodium) असते. असं म्हणतात की दही नाही तर त्यापेक्षा ताक अन्नपचनासाठी उपयुक्त असते. तर ते खरे आहे याचे कारण असे की तुमची पचनक्रिया जर का बिघडली असेल तर त्यांनी दह्याचे सेवन करणे टाळावे. 


कोणी खाऊ नये दही? 


  • दह्यानं तुमच्या शरीराला थंडावा मिळतो. पचनक्रियेसाठी (Weak Digestive System) आणि गॅस (Gases) कमी होण्यासाठीही दह्याचे सेवन केले जाते परंतु अशा लोकांनी ज्यांना अपचनाचा आणि गॅसेसचा त्रास आहे त्यांनी जास्त प्रमाणात दही खाऊ नये. शक्यतो अशांनी दही खाणं टाळावे. ज्यांना कॉन्सिपेशन (Constipation) आहे त्यांनी दह्यांचे सेवन करू नये. 

  • जास्त स्थूल व्यक्तींनी दह्याचे सेवन करणे टाळावे. जास्त दह्याचे सेवन केल्यानं तुम्हाला कदाचित स्थूलतेचा (Obesity) सामना करावा लागेल. 

  • लॅक्टोज इनटॉलरन्ट (Lactose Intolerant) अशा लोकांनी दह्याचे सेवन करू नये. 

  • अस्थमा (Asthama), सर्दी, खोकला असणाऱ्यांनीही दही खाऊ नये. 

  • अर्थ्रायटिस (Arthitris) असणाऱ्या लोकांनीही दह्याचे सेवन करू नये. यानं जॉईंट पेन होण्याची शक्यता असते. 


रात्री दह्याचे सेवन टाळावे कारण आयुर्वेदात असे म्हटले गेले आहे की, दह्यात गोड आणि आंबट असे दोन्ही गुणधर्म असतात तेव्हा अशावेळी शरीरात मकस (Mucus) तयार होऊ शकते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. तेव्हा अशा लोकांनी वेळीच दह्यातचे सेवन करणं टाळावे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)