Curry Leaves 10 Benefits :  कढीपत्ता हा प्रत्येक भारतीय स्वंयपाक घरातील पदार्थ आहे. फक्त चवीसाठीच नाही तर औषधीय गुणांनी समृद्ध असा हा पदार्थ अतिशय लोकप्रिय सामग्रीपैकी एक आहे. कढीपत्ता हा शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुण असणारा हेल्दी पदार्थ आहे. कढीपत्त्याचे सेवन करणे हे कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर सारख्या 10 आजारांवर गुणकारी ठरतं. यामध्ये कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषकतत्वांनी समृद्ध असते. त्यामुळे कढीपत्त्यामधून शरीराला असंख्य फायदे मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेदानुसार, कढीपत्त्यांचे सेवन हे अनेक शतकांपासून केले जात आहे. उन्हाळ्यात कढीपत्ताचे सेवन केल्यास त्याचे जास्त फायदे होतात. एक्सपर्टकडून आयुर्वेदानुसार 10 जबरदस्त फायदे जाणून घेऊया. 


उन्हाळ्यात शरीर राहतं थंड 


कढीपत्ता हा थंड पदार्थ आहे. उन्हाळ्यात याचं सेवन केलं तर शरीर कूल राहण्यास मदत होते. एवढंच नव्हे तर पचनक्रिया देखील सुधारते. रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर गॅस, ऍसिडिटी, पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. 


कोलेस्ट्रॉल राहतं कंट्रोलमध्ये 


कढीपत्ता खाल्ल्यावर घाणेरडा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. तसेच हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. शरीरात घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. 


डायबिटिज कंट्रोलमध्ये 


ब्लड शुगर कायमच जास्त असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्याचे सेवन केल्यावर शरीरातील इन्सुलिनची लेवल सुधारते. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. 


वजन होते कमी 


कढीपत्त्याचे सेवन केल्यावर वजन कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, कढीपत्ता गायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट सारखे तत्व आहेत. जे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. 


त्वचा आणि केस सुधारतात 


कढीपत्त्याची पेस्ट स्किनवर लावल्यास त्वचा अतिशय तजेलदार होते. चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होतात. तसेच कढीपत्त्याचा वापर हेअर मास्क म्हणून देखील करू शकतो. यामुळे डँड्रफ कमी होण्यास मदत होते. यामुळे केस सिल्की आणि शायनी दिसतील. 


डोळ्यांसाठी फायदेशीर


दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. कढीपत्त्यात विटामिन ए मुबलक प्रमाणात असते. दृष्टी सुधारण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या सेवनाने मोतीबिंदूपासून आराम मिळतो.


यकृतासाठी फायदेशीर


जास्त अल्कोहोल, तेलकट अन्न, जंक फूड यांमुळे यकृत खराब होते. यकृतावर अनावश्यक चरबी वाढते. कढीपत्ता यकृतासाठी फायदेशीर आहे. एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, कढीपत्ता खाल्ल्याने यकृत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहू शकते. हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यकृत निरोगी ठेवण्याचे काम करतात.


सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो


सर्दी, खोकला अशा समस्या आहेत. कफ जास्त असतो. छातीत रक्तसंचय होत असेल आणि सायनुसायटिसची समस्या कायम राहिल्यास कढीपत्ता खूप आराम देतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. कॅम्पफेरॉल, व्हिटॅमिन सी आणि ए चे संयुग, त्यात दाहक-विरोधी घटक असतात. हे छातीला आराम देण्याचे काम करते.


मॉर्निंग सिकनेसपासून आराम 


अनेकांना सकाळी उठल्यावर मरगळ किंवा भोवळ येते. अशावेळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास मॉर्निंग सिकनेस कमी होतो. तसेच सकाळचा थकवा हा तुमचा दिवस खराब करू शकतो. अशावेळी तुम्ही फ्रेश असणे गरेजेचे आहे. 


बुद्धी तल्लख होते


लहान मुलं कढीपत्ता खायला टाळाटाळ करतात पण असं न करता त्यांना ते खायला लावा. कारण कढीपत्त्यामुळे बुद्धी तल्लख होते. मेंदू अगदी 100 च्या स्पीडने धावतो.