मुंबई : मधल्या वेळेस भूक लागल्यास सहाजिकच कूकीज, मफिन्स असे पदार्थ खाल्ले जातात. पण यामध्ये मैदा, साखर असल्याने तुमची तात्पुरती भूक मिटली तरीही आरोग्याला हानीकारक ठरते. अनेकदा वजन घटवण्याचा प्लॅन करत असाल तर साखरेला दूर ठेवा असा सल्ला दिला जातो. पण खरंच  साखर कमी खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते का ?  


वजन घटवण्यासाठी काय कराल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहाराच्या सवयीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. मधल्या वेळेस गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी झटकन वाढते. उलट अधिक गोड खाण्याची इच्छाही वाढते. 
स्वादूपिंडाचे कार्यही अधिक वाढते. अशावेळेस अधिक प्रमाणात इन्सुलिन खेचले जाते. यामुळे फॅट सेलमध्ये ग्लुकोज वाढते. परिणामी वजनही वाढते. म्हणोऔनच वजन घटवताना साखर खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. 


साखर पूर्ण टाळू नका 



शरीरात साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरही आवश्यक आहे. आहारातील भाज्या आणि फळांमधून नैसर्गिक स्वरूपातील साखर मिळते. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते. 


आहारात रिफाईंड शुगर टाळा. तसेच प्रोसेस्ड फूड टाळा. फ्लेव्हर्ड योगर्ट, गोड शीत पेय,  गोडाचे पदार्थ याचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.  यामुळे ७५ % रिफाईन्ड शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते. 


साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास टीप्स 


बाजरातून विकतची बिस्कीटं, शुगर बार, एनर्जी बार विकत घेणं टाळा. 


पदार्थ विकत घेताना त्यावरील लेबल वाचा. त्यामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे हे तपासून पहा. 


मध, ऊस किंवा गोड फळं साखरेचा नैसर्गिक स्त्रोत आहे. 


फळांचा रस, स्क्वॅश घेण्याऐवजी त्या फळांचा थेट आहारात समावेश करा.