मुंबई : सध्याच्या व्यस्त लाईफस्टाईलमुळे लोकांना आपल्या स्वत:च्या शरीराकडे पाहण्यासाठी जराही वेळ नसतो. ज्यामुळे लोक कसंही जेवण करतात, केव्हाही झोपतात. त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तसेच नुसतं शरीर आरोग्य ठेवणे हेच महत्वाचं नसतं, तर मनाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्या मेंदूचा कंट्रोल असतो आणि जेव्हा आपला मेंदू थकतो, तेव्हा मात्र आपल्याला कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलंशरीर आणि मन दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. परंतु व्यक्ती स्वत:चं नकळत अशा काही चूका करतात. ज्याचा थेट परिणाम शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यालाही होतो. 


चला तर आपण त्या सवयींबद्दल जाणून घेऊ या, ज्या आपल्या मेंदूला किंवा मनाला आतून पोकळ बनवतात.


1. धूम्रपानाची सवय


अनेक लोक कामाच्या तणावामुळे धूम्रपानाची सवय स्वत:ला लावतात. त्यांचं असं म्हणणं असतं की, धुम्रपान केल्याने त्यांचा ताण दुर होतो आणि काम करण्यात लक्ष लागतं. परंतु त्याना हे माहित नाही की, त्याची ही सवय त्यांच्या मेंदूला आतून पोकळ करतेय. दररोज धूम्रपान केल्याने तुमची स्मरणशक्ती खराब होऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडा किंवा त्याची सवय लावूव घेऊ नका.


2. जंक फूड खाण्याची सवय


जंक फूड आणि साखरेचे अतिसेवन केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो. साखर खाल्ल्याने मेंदूचा विकास मंदावतो. ज्यामुळे अशा पदार्थांपासून लांबच राहा


3. पुरेशी झोप न घेण्याची सवय


कमी आणि उशिरा झोपल्याने मेंदूच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. सामान्य व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप वेळेवर घेतली पाहिजे.


4. रागावण्याची सवय


ज्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही रागावण्याची सवय असते, त्यांचा मेंदू हळूहळू काम करणं थांबवतं. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या मज्जातंतूंवर दबाव येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात. त्यामुळे मेंदूची शक्ती कमी होऊ लागते.