सतत प्रवासात असाल तर या आजारांपासून सावधान...
व्यवसायाच्या किंवा अन्य कारणामुळे सतत फिरतीवर असणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. एक नव्या संशोधनानुसार, नेहमी फिरतीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंताग्रस्त आणि निराशावादाच्या समस्या निर्माण होतात.
मुंबई : व्यवसायाच्या किंवा अन्य कारणामुळे सतत फिरतीवर असणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. एक नव्या संशोधनानुसार, नेहमी फिरतीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंताग्रस्त आणि निराशावादाच्या समस्या निर्माण होतात.
अशा लोकांना धुम्रपानाची सवय, सुस्ती आणि झोपेच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, असंही या संशोधनाच्या अहवालात म्हटलं गेलंय. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाशी संबंधित जास्त प्रवास करणाऱ्या व्यक्ती दारुवरही अवलंबून राहतात. अशा लोकांच्या वर्तवणुकीवरही लगेचच परिणाम दिसून येतोय.
अपुऱ्या झोपेचा आणि गैरवर्तवणुकीचा परिणाम मानसिकरित्याही होतो... कारण, हे लोक अनेक दिवस आपल्या घरापासून, आपल्या जवळच्या व्यक्तींपासून लांब राहतात.
अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर एन्ड्य्रु रंडले यांच्या म्हणण्यानुसार, व्यावसायासंबंधी प्रवास व्यावसायिक लाभानुसार पाहिला जातो. रात्री आठ तासांपेतक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांना निराशावादाचा सामना करावा लागतो. झोपेचा संबंध निराशावादाशी आणि मानसिक विकारांशी असतो, असंही संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.