वॉशिंग्टन : सध्या जगभरात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट पाहायला मिळत आहे. 2020 विचार करता 2021 मध्ये, कोरोना विषाणूचा  (Coronavirus) मोठ्या प्रमाणमात प्रादुर्भाव होत आहे. खूप वेगाने कोरोना पसरत आहे. त्यामुळे उद्रेक पाहायला मिळत आहे.  कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यास कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. परंतु आता एका नवीन अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की, स्पर्श करुन कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की, आपण मास्क वापरणे थांबवावे, सोशल डिस्टन  (Social Distancing) न पाळणे आणि स्वच्छता थांबवावी. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे हे सर्वात अचूक मार्ग आहेत. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे आहे. साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजे. बाहेर वावरताना प्रत्येकांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे.


सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोलचा काय आहे दावा ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत (United States) केलेल्या एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की.  स्पर्श केल्यास कोविड-19 (Covid-19)संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. जरी संसर्ग झाला असेल. Centers For Disease Control मते, आता  स्पर्श करुनही संसर्ग होण्याची शक्यता 10 हजार लोकांपैकी एकालाच आहे.


वस्तूला स्पर्श करणार्‍याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे


सीडीसीने  (CDC) कोणत्याही गोष्टीस स्पर्श करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तज्ज्ञांनी गेल्या वर्षी एक सल्ला देताना सांगितले की, सार्वजनिक वाहतूक, सुपरमार्केट आणि इतर ठिकाणी कोणत्याही गोष्टीला स्पर्श करु नका. जरी आपल्याला स्पर्श करावा लागला तरी ताबडतोब हात स्वच्छ करा. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की वस्तूंना स्पर्श करण्याचा धोका कमी आहे.


या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका जास्त 


सीडीसीच्या  (CDC) म्हणण्यानुसार, आता बंद ठिकाणी, गर्दी असलेल्या आणि हवेशीर ठिकाणी असणाऱ्या  लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. अशा ठिकाणी संक्रमित लोक जास्त असल्यास इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असेल. रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. रोशेल वॅलेन्स्की यांच्या मते, लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करुनही संसर्ग होऊ शकतात. पण आता याची शक्यता खूप कमी आहे.


व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीच्या (Virginia Tech University) एअरबोर्न डिसीजच्या तज्ज्ञ  लिन्सी म्हणाले की, आम्हाला याबद्दल बर्‍याच काळापासून माहीत आहे. परंतु लोक अजूनही घरात आणि बाहेर गोष्टी सॅनिटायझर करण्यासाठी व्यस्त आहेत. एखाद्या पृष्ठभागास स्पर्श करताना, कोरोना संक्रमणाचा धोका कमी असतो. आम्ही हे म्हणत आहोत कारण आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्यामुळे कोणी आजारी पडला आहे.


आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड -19 हवेच्या माध्यमातून अधिक पसरत आहे हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक, हवेत संसर्ग झालेल्या कोरोनाच्या नाक आणि तोंडातून थेंब बाहेर पडत आहेत, ज्यामुळे इतर लोक संक्रमित होत आहेत.