Dates Hair Pack For Silky And Shine Hair : कोणत्याही व्यक्तीला त्याचे केस हे खूप प्रिय असतात. त्यात आपल्या केसांच्या सौंदर्यासाठी अनेक गोष्टी करतात. महागड्या प्रोडक्ट्स पासून अनेक टीप्स ते सलॉनमध्ये जाणून वेगवेगळ्या ट्रिटमेन्टसुद्धा करतो. प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या केसांमध्ये बदल होत राहतात. कधी ते ऑइली होतात तर कधी स्टीकी तर कधी त्यांच्यात कोंडा होतो. अशा वेळी आपण ऑइल मसाज, शॅम्प्यू आणि कंडिश्नर बदलण्यापासून हेअर स्पा देखील करतो. आपले केस सुंदर दिसावे यासाठी आपण बऱ्याच ट्रिटमेंट करतो... जेणेकरून ते सिल्की आणि शाईनी होतील... केसांसाठी आपण जेव्हा ट्रिटमेंट करतो तेव्हा आपण पैशांचा विचार करत नाही तर सलॉनमध्ये जितके पैसे मागितले तितके देतो. त्यात सगळ्यात महाग ही कॅरिटीन ट्रीटमेंट आहे. पण जर आज तुम्हाला कळलं की आपण घरच्या घरी घरगुती उपाय करत कॅरिटीन ट्रीटमेंट करू शकतो तर तुम्हाला होईल ना आनंद... चला तर जाणून घेऊया घरगुती  कॅरिटीन ट्रीटमेंट करण्यासाठी सोपा आणि घरगुती उपाय... (Dates) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण खजूरच्या हेअर पॅक विषयी जाणून घेणार आहोत. खजूरमध्ये आयरनची प्रमाणे खूप असते. अशात जर आपण खजूरच्या हेअर पॅक लावली तर त्यानं आपल्याला किती फायदे होऊ शकतात. खरंतर खजूरचा हेअर पॅक लावल्यानं ब्लड सर्कुलेशन होण्यास मदत होते. खजुरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे आपले केस हे सिल्की आणि चमकदार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी हेअर पॅक बनवण्याची पद्धत...


खजूर हेअर पॅक बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील (How to make dates hair pack)


खजूर 4-5
मेयोनिज पाव कप 
या दोन गोष्टींपासून खजूर हेअर पॅक तुम्ही बनवू शकतात


हेही वाचा : Amitabh Bachchan यांच्यासोबत 'चिनी कम'मध्ये काम केलेल्या 'त्या' चिमुकलीचा झाला साखरपुडा; पाहा खास फोटो


खजूर हेअर पॅक बवण्याची पद्धत तुम्हाला माहितीये का? 


सगळ्यात आधी खजूर घ्या... त्यानंतर थोडा वेळ हे खजूर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर काही वेळानंतर खजूरची पेस्ट बनवून घ्या. खजूरच्या पेस्टमध्ये त्यानंतर तुम्ही मेयोनिज घाला. आता तुमचा हेअर पॅक तयार आहे. मग तुम्ही हा पॅक केसांना आणि स्कॅल्पला व्यवस्थित लावा. त्यानंतर 20 मिनिटांनंतर माइल्ड शॅंम्प्युनं धुवून काढा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)