मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात हमखास बाजरीचा आहारात समावेश केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतूमानानुसार आहारात धान्यांचा समावेश केल्यास आरोग्याच्या समस्या कमी होतात. बाजरी गरम असल्याने हिवाळ्यात त्याचा हमखास समावेश केला जातो. बाजरीची भाकरीव्यतिरिक्तही इतर पदार्थ आहेत. मग बाजरी इतरही कोणकोणत्या आरोग्यदायी पद्धतीने आहारात समाविष्ट केली जाऊ शकते हे पाहण्यासाठी हे हेल्दी आणि टेस्टी पदार्थ अवश्य चाखा.  


सूप  - 


बाजरीचं सूप ही गुजराती खाद्यसंस्कृतीतील एक डिश आहे. त्याला राब म्हणतात. हिवाळ्यात हे प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. या सूपमध्ये खडा मसाला म्हणजेच लवंग, दालचिनी, काळामिरी तुपामध्ये परता. त्यामध्ये बाजरीचं पीठ मिसळा. गूळ आणि पाणी मिसळून त्याचं सूप बनवा. यामुळेघशातील खवव कमी होते.  


कटलेट्स 


बाजरीची कटलेट्स शॅलो फ्राय स्वरूपात बनवली जातात. बाजरीच्या पीठात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, मेथी, मसाला आणि दही मिसळा. त्याचे कटलेस बनवून शॅलो फ्राय करा.  


बाजरी खिचडी -  


बाजरी भिजवून ती भाज्यांसोबत शिजवा. नंतर वाफवा. यामध्ये तूप मिसळून हिवाळ्याच्या दिवसात अवश्य खावी. पोषक आणि पोटभरीचा आहार आहे.  


बाजरी मेथी वडी 


बाजरीचे पीठ, चिरलेली मेथी, हिरव्या मिरच्या, मीठ, मसाला आणि दही एकत्र मिसळा. सारे एकजीव करून त्याचे उंडे बनवा. १५-२० मिनिटं हा उंडा वाफवा. त्या नंतर छोटे तुकडे कापून हिरव्या चटणीसोबत त्याचा चहा, कॉफीसोबतही आस्वाद घेऊ शकता.