Coffee चं अतिसेवन आरोग्यासाठी ठरु शकतं घातक, जाणून घ्या कसं?
Excessive Coffee Drinking : कॉफीची चव अनेकांना आकर्षित करत असली तरी त्याची सवय तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते. कॉफीचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं नाही तर अनेक समस्यांना उद्भवू शकतात.
Coffee Side Effects: भारतात कॉफीची आवड असणाऱ्यांची कमतरता नाही, मग ती फिल्टर कॉफी असो किंवा दुकानात मिळणारी कॅपुचिनो, ती प्यायल्यावर शरीरात पिणाऱ्यामध्ये उत्साह निर्माण होतं. आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असलेल्या कॉफीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. पण काहींना गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायला आवडतं. जास्त प्रमाणात कॉफी पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात, अति प्रमाणात कॉफी पिण्याचे तोटे काय आहेत.
कॉफी पिण्याचे तोटे :-
डेंमेशिया (Dementia)
जे लोक दिवसातून 5 किंवा 6 कपपेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना डिमेंशियाचा धोका वाढतो. हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये रुग्ण सामान्यपणे मानसिकरित्या वागू शकत नाही. त्याचबरोबर, यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारखे आजार होऊ शकतात.
निद्रानाश (Insomnia)
आपण कॉफी पितो कारण आपल्याला ताजेतवानं वाटतं आणि झोप आणि थकवा नाहीसा होतो. त्यामुळे सतर्कता वाढते, मात्र कॉफीचे प्रमाण जास्त प्यायल्यास कॅफिनमुळे झोप योग्य वेळी येत नाही आणि त्याचबरोबर झोपेची पद्धतही पूर्णपणे विस्कळीत होते.
डायजेशन प्रॉब्लम (Indigestion)
कॉफी पिण्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या पोटावर होतो कारण ते गॅस्ट्रिन हार्मोन सोडते ज्यामुळे कोलनची क्रिया वाढते. भरपूर कॉफी प्यायल्यास पचनाची समस्या उद्भवू शकते.
हाय ब्लड प्रेशर (High BP)
कॉफीमध्ये कॅफिन मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते रक्तदाब वेगाने वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हाला हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असेल तर कॉफी अगदी कमी प्रमाणात प्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ही माहिती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)