मुंबई : तुम्ही कधी ऐकलंय का तुम्ही तुमच्या बाळाची तुम्ही स्वतः रचना करू शकता? कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. विज्ञानाच्या साहाय्याने पालक मुलांमध्ये तीच जीन्स आणू शकतात, जी मजबूत असतात, तर कमकुवतपणा, आजार यासारखी जीन्सचा समावेश नसतो. याला बेबी डिझाईन करणं म्हणतात. 


डिझायनर बेबी नेमकं काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डिझायनर बेबी' हे एक अर्भक आहे ज्याचा विकास भ्रूण अवस्थेत प्री-इम्प्लांट केलेला असतो. यानंतर गर्भ बाळाच्या रूपात जन्माला येतो. असं केल्याने त्याच्या जन्मानंतरच्या लक्षणांवर परिणाम होऊ शकतो.


जेनेटिक इंजिनियरिंग आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नोलॉजीच्या प्रगतीमुळे विट्रो फर्टिलायझेशनदरम्यान इम्प्लांटेशन करण्यापूर्वी जेनेटिक डिसऑर्डरसाठी भ्रूण तपासणं शक्य झालंय. प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (PGD) वापरून, भ्रूणांमध्ये असलेले असे जीन ज्यामध्ये काही दोष आहेत ते ओळखणं सोपं झालं आहे.


परिणामी हे मूल जेनेटिक डिसऑर्डर टाळू शकतं. अशा बाळांना 'डिझायनर बेबी' म्हणतात कारण ते जनुकीय बदलांद्वारे 'डिझाइन' केली जातात.


​डिजाइनर शिशु कल्पना काल्पनिक नाही


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही काल्पनिक गोष्ट नाही. जगातील पहिले डिझायनर बेबी अॅडम नॅश आहे. तिचा जन्म 2000 साली अमेरिकेत झाला. IVF आणि PGD द्वारे तिच्या पालकांनी फॅन्कोनी अॅनिमियाने ग्रस्त नसलेल्या बाळाची रचना केली. 


2018 मध्ये चीनमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं. एका चिनी शास्त्रज्ञाने जगातील पहिलं जीन-एडिटिड ह्यूमन बेबी तयार केल्याचा दावा केला आहे. लुलू आणि नाना अशी या मुलांची नावं आहेत.


डिझायनर बेबी तयार करणे कायदेशीर आहे का?


डिझायनर बाळ तयार करणं कायदेशीर/बेकायदेशीर आणि नैतिक/अनैतिक यांच्यामध्ये अजून फसलेलं आहे. डिझायनर मुलं असण्याच्या नैतिक बाजूवर एकमत नाही. हा मुद्दा वादाचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मानवी जीनोम संपादनाशी संबंधित काही ethical concerns असल्याचं स्पष्ट केलं.